Competition Sakal
Trending News

Lazy Competition : सर्वांत आळशी व्यक्तीला मिळणार 90 हजारांचे बक्षीस; काय आहे नेमकं प्रकरण? स्पर्धेविषयी जाणून घ्या

विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये मोबाईल, फोन, लॅपटॉपसुद्धा वापरता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

आपल्या आजूबाजूला अनेक आळशी लोकं असतात. आळस हा माणसाचा शत्रू आहे असंही आपल्याला अनेकदा सांगितलं जातं. पण जो सर्वांत जास्त आळशी असेल त्याला पुरस्कार मिळणार असं आपल्याला सांगितलं तर विश्वास बसणार नाही. पण एका देशामध्ये अशी स्पर्धा भरली आहे. त्यामध्ये सर्वांत आळशी असणाऱ्या व्यक्तीला साधारणपणे ९० हजार रूपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. काय आहे नेमकं प्रकरण? वाचा सविस्तर...

ही स्पर्धा उत्तर माँटेनेग्रो या देशातील असून येथील ब्रेजना येथे ही विचित्र स्पर्धा भरली आहे. यामध्ये एक नंबर येणाऱ्या व्यक्तीला 'सर्वांत आळशी मनुष्य' हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी तब्बल १०७० डॉलर म्हणजे सध्याच्या ८८ हजार ६३६ रूपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये २१ जणांनी सहभाग घेतला असून त्यातील १४ जणांनी आत्तापर्यंत माघार घेतली आहे.

हे सर्व स्पर्धक मागच्या २० दिवसांपासून गादीवर झोपलेले आहेत. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना आठ तासांतून एकदा फक्त १० मिनिटांचा उठण्यासाठी ब्रेक मिळतो. त्यामध्ये त्यांनी इतर स्वच्छतेची कामे करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर मोबाईल, लॅपटॉप, फोन वापरण्यासही परवानगी आहे पण हे सगळं काम झोपून करावे लागणार असल्याचे नियम या स्पर्धेसाठी ठेवण्यात आले आहेत.

सदर स्पर्धक मागच्या ४७० तासांपासून झोपलेले आहेत. तर मागच्या १२ वर्षांपासून ही स्पर्धा सुरू असल्याचं आयोजकांनी सांगितलं आहे. येथील लोकं किती आळशी आहेत हे दाखवण्यासाठी ही स्पर्धा सुरू झाली होती. पण त्यानंतर ही स्पर्धा कायमचीच सुरू झाल्याचंही आयोजकांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : गुडलक कॅफे प्रकरणाची व्यवस्थापनाकडून दखल, कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT