Viral Video esakal
Trending News

Viral Video: दारु वाईट! हातभट्टी पिऊन बिबट्या झाला टल्ली; लोकांनी गळ्यात हात टाकून काढल्या सेल्फी

Social Media Trending: बिबट्या आल्याचं पाहून हातभट्टीवर असलेले लोक पळाले, काही लपून बसले तर काहीजण झाडावर चढून बसले. बिबट्या तहानलेला होता. त्याने थेट पाणी समजून तिथली हातभट्टी रिचवली. हातभट्टी पिऊन झाल्यावर बिबट्या गुगंला.. एवढा गुंगला की त्याला धड चालायचं भान राहिलं नव्हतं.

संतोष कानडे

Leopard News: दारु पिल्यानंतर माणसाचा कधी माकड होईल, हे सांगता येत नाही. परंतु बिचारे प्राणीदेखील कधी चुकून दारु प्यायलेच तर त्यांनाही दारु सोडत नाही. अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बिबट्याचा मांजर झाल्याचं बघायला मिळतंय.

बिबट्या म्हटलं की, भल्याभल्यांची त्रेधातिरपीट उडते. आजकाल बिबट्याचा वावर हा मानवी वस्तींमध्ये होत आहे. त्याचं कारण वाढतं शहरीकरण आहे. परंतु ही जी घटना आहे ती गावाजवळच्या एका जंगलामधली आहे. जिथे हातभट्टीची दारु काढण्याचं काम सुरु होतं तिथंच बिबट्या अवतरला.

बिबट्या आल्याचं पाहून हातभट्टीवर असलेले लोक पळाले, काही लपून बसले तर काहीजण झाडावर चढून बसले. बिबट्या तहानलेला होता. त्याने थेट पाणी समजून तिथली हातभट्टी रिचवली. हातभट्टी पिऊन झाल्यावर बिबट्या गुगंला.. एवढा गुंगला की त्याला धड चालायचं भान राहिलं नव्हतं.

मग काय लोकांना एवढंच पाहिजे होते. त्यांनी थेट बिबट्याला रिंगण घालून त्याची मजा घ्यायला सुरुवात केली. बिबट्याचे पाय धडपडत होते, डोळे स्थिर नव्हते. त्यामुळे लोकांनी त्याला मिठ्या मारल्या, काहींनी सेल्फी घेतल्या तर काहींची हसून हसून गाळण झाली.

हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही घटना नेमकी कुठली, कधी घडली, याबाबत माहिती मिळालेली नाही. गावकऱ्यांनी बिबट्याला नंतर जंगलात सोडल्याचंही सांगितलं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT