Video Viral Sakal
Trending News

Viral Video : चिमुकलीनं भलामोठा साप शेपटीला धरून आणला घरात! सगळ्यांचीच पळापळ; थरारक व्हिडिओ

एका वर्षाच्या चिमुकलीने कुटुंबाला सळो की पळो करून सोडलं

सकाळ डिजिटल टीम

साप बघितला तर भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. साप, अजगर, मगर असे प्राणी पाहून सगळेच घाबरून जातात. एखाद्या चिमुकल्याने सापाच्या शेपटीला धरून त्याला घरात आणलं तर आपल्याला विश्वास बसणार नाही. पण सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका चिमुकलीने सापाच्या शेपटीला धरून घरात आणलं आहे.

हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. साधारण एक ते दोन वर्षाची चिमुकली सापाच्या शेपटीला धरून ती आतल्या घराच्या उंबऱ्यापर्यंत येते. त्यावेळी घरात बसलेल्या महिला घाबरून पळू लागल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर एका चिमुकलीने सगळ्यांचीच पळापळ केल्याचं यामध्ये दिसत आहे.

त्यानंतर एका व्यक्तीने चिमुकलीच्या हाताला धरून तिला बाहेर नेलं आहे. मध्ये एकदा या चिमुकलीचा पाय सापावर पडतो. पण सुदैवाने साप या चिमुकलीवर हल्ला करत नाही. हा साप त्यांनी पाळला असल्याची माहिती काही नेटकऱ्यांनी कमेंट करून सांगितली आहे. पण आतल्या घरात बसलेल्या महिलांची चांगलीच घाबरगुंडी उडाल्याचं यामध्ये दिसत आहे.

दरम्यान, इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून नेटकऱ्यांनी या व्हिडिओला चांगलीच पसंती दिली आहे. आत्तापर्यंत जवळपास ७ लाख १५ हजार नेटकऱ्यांनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडिओवर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

"चला मंडळींनो आज मी तुम्हाला माझ्या नव्या मित्राची ओळख करून देत आहे, ये ये लाजू नको मी तुला माझ्या कुटुंबाची ओळख करून देते असं चिमुकली म्हणत असेल" अशा विनोदी कमेंट नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT