Viral Video
Viral Video Sakal
Trending News

Viral Video : दोन वर्षापासून लहान भावाची वाट पाहत होता, अखेर त्याला कळालं अन् आईला...

सकाळ डिजिटल टीम

आपल्या घरात एखादा नवा पाहुणा येणारे असं कळालं की सर्वांनाच मुलखाचा आनंद होत असतो. तर अनेकदा आपल्याला लहान भाऊ किंवा बहिण होणार असल्याचं कळाल्यावरचा आनंद गगनात मावत नसतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक आई आपल्या मुलाला घरात बोलावते आणि त्याला एक नवीन शर्ट घालते. त्यानंतर तो शर्टवरील अक्षरे वाचू लागतो. "मी आता मोठा भाऊ होणार आहे" असं त्यावर लिहिलेलं असतं. त्यानंतर या चिमुकल्या मुलाला मोठा आनंद होतो आणि त्यानंतर तो आपल्या आईला कडकडून मिठी मारतो.

हा मुलगा मागच्या दोन वर्षापासून आपल्या आईवडिलांना लहान भावंडाविषयी विचारत होता असं या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तर या मुलाने आनंदित होऊन आईला मिठी मारल्यानंतर त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू येत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT