bihar sakal
Trending News

Love Story: 'इस प्यार को क्या नाम दूँ', पत्नी सोडून गेली, साधू बनला, एअरफोर्सची नोकरी सोडली; अन् 15 वर्षानंतर अचानक…

बिहारमधील मोतिहारी येथून पती-पत्नीची अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे.

Aishwarya Musale

बिहारमधील मोतिहारी येथून पती-पत्नीची अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. हे पाहून सगळेच थक्क झाले. सुमारे 15 वर्षांपूर्वी किरकोळ वादातून पती-पत्नी वेगळे झाले होते. बायको घरी आली आणि शिकू लागली. त्याचवेळी पत्नीपासून विभक्त झाल्यामुळे पती तुटला आणि हवाई दलाची नोकरी सोडून संन्यासी झाला. घरोघरी भटकत पूजा करू लागला.

पती-पत्नी कायमचे वेगळे झाले. मात्र 15 वर्षे दूर राहूनही दोघांचे प्रेम एकमेकांवर कायम होते. बायकोच्या आयुष्यात ना कोणी आलं ना नवऱ्याने कोणाला आपल्या आयुष्यात येऊ दिलं.

दरम्यान, दोघांचे मूलही मोठे झाले आणि आईला वडिलांबद्दल वारंवार विचारू लागले. दोघेही एकांतात भेटले. आणि जुन्या तक्रारी विसरून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.

लग्नाच्या 2 वर्षानंतरच ते वेगळे झाले

गोविंदगंज पोलिस स्टेशन हद्दीतील जितवारपूर येथील रहिवासी प्रभाकर कुमासेर पांडे यांचा विवाह पिपरकोठी पोलिस स्टेशन हद्दीतील बांगारी गावात राहणाऱ्या संदीप देवीसोबत झाला होता. दोघेही जवळपास दोन वर्षे आनंदाने एकत्र राहिले.

त्यावेळी प्रभाकर पांडे हे एअरफोर्समध्ये उच्चपदावर कार्यरत होते. किरकोळ कारणावरून दोघांमधील कौटुंबिक कलह वाढत गेला. यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

पती-पत्नीने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला

यादरम्यान कोर्टात केस सुरू असताना दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले. नातेवाइकांनी तडजोडीचे प्रयत्नही केले, मात्र काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर 15 वर्षांनी मुलाला वडिलांची आठवण येऊ लागली, तेव्हा त्या महिलेला वाईट वाटले. आता पती-पत्नीने पुन्हा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack: बीडमध्ये धक्कादायक घटना! मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात सहा वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

गोदाघाटावर अघोरी पूजा, महिलेसोबत विचित्र प्रकार; १ लाख ६० हजारांची फसवणूक अन् २१ वर्षीय मुलीचा बळजबरीने साखरपुडा

Akola Drought : अकोल्यात खारपाणपट्ट्यात सप्टेंबरअखेरच दुष्काळाची दाहकता! महिनाभरातून एकदा नळाला पाणी; टाक्यांमध्ये साठवलेले पाणी आरोग्यास घातक

Mumbai News: हॉटेलमध्ये डोशात मृत उंदीर सापडला; ग्राहकाला उलट्या; मुंबईतील किळसवाणा प्रकार!

Marathi News Live Updates: दुष्काळाची तीव्रता पाहता चारा छावण्या सुरू करण्याचे आमदार बंब यांचे आश्वासन

SCROLL FOR NEXT