Viral  Sakal
Trending News

Viral : "करिश्मा माझी आहे, वरात घेऊन आलास तर..." प्रियकराची नवरदेवाला जाहीर धमकी

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तरप्रदेश येथील एका मुलाने आपल्या प्रेयसीच्या भावी नवऱ्याला जाहीर धमकी दिल्याची घटना घडली आहे. प्रेयसीच्या घराच्या जवळ त्याने धमकी दिल्याची चिठ्ठी सापडली असून ही चिठ्ठी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरू आहे.

हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

दरम्यान, उत्तरप्रदेशमधील हापूड येथील ही घटना असून एका प्रियकराने आपल्या करिश्मा नावाच्या प्रेयसीचं लग्न ठरलं म्हणून तिच्या भावी नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्याने चिठ्ठीवर लिहून धमकी दिली असून चिठ्ठीत लिहिलंय की, "कान उघडे ठेवून ऐक नवरदेव मोन्टू सिंह, वरात घेऊन नको येऊ, नाहीतर जिवंत राहणार नाहीस.

मी सगळ्या वरातीला स्मशान बनवून टाकेल. ज्या लोकांना या भावाच्या पार्टीत गोळ्या खायच्या असतील त्यांनीच या वरातील यावे. हा फक्त ट्रेलर आहे संपूर्ण फिल्म वरातीत दिसेल." असं आरोपीने चिठ्ठीत लिहिलं आहे.

अशा प्रकारची धमकी दिल्यामुळे वातावरणात भिती पसरली असून यासंदर्भात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या तरूणाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केल्याची माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivli News : आधी वाहतुक कोंडी आणि त्यातच कल्याण-शीळ रोडवर मोठा दिशा दर्शक फलक अचानक कोसळला...

Cricketer Accident: क्षणात संपलं आयुष्य! भारतीय क्रिकेटरचा थरारक अपघातात मृत्यू, CCTV फुटेज पाहून अंगावर येईल काटा

Police Recruitment: राज्यातील पोलिस शिपाई पद भरतीला मान्यता; शासनाची उच्च न्यायालयात माहिती, कारागृह शिपायांसह १५ हजार पदे भरणार

Latest Marathi News Updates : परळीत मनोज जरांगे पाटील यांच्या बॅनरवर झळकले दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांचा फोटो...

माेठी बातमी! 'काेल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रमाणपत्रांची फेरपडताळणीचे आदेश'; शिक्षकांची उडाली तारांबळ

SCROLL FOR NEXT