Social Media Viral Video Sakal
Trending News

"बस आज की रात है जिंदगी"; खरे ठरले गाण्याचे बोल, डान्स करताना जागेवर मृत्यू | Viral Video

Viral Marathi News: हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Marathi News: कोरोना काळानंतर तरूणांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. २० ते ४० वयाच्या अनेक तरूणांचे चालता बोलता जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

डान्स करताना, बोलताना आणि जीममध्ये अनेक तरूणांचे जीव गेल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. पण सध्या डान्स करताना मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सदर घटना मध्यप्रदेशमधील भोपाळ येथे घडली असून पोस्टल विभागाच्या सहाय्यक डायरेक्टर यांचा डान्स करता करता मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पोस्टल विभागाकडून हॉकी टुर्नामेंटचं आयोजन करण्यात आलं होतं. १७ मार्च रोजी फायनल सामना खेळल्यानंतर या विभागाकडून सांस्कृतीक कार्यक्रमाचे करण्यात आले होते.

दरम्यान, यावेळी विभागातील सहाय्यक डायरेक्टर सुरेंद्र कुमार दिक्षित या कार्यक्रमात डान्स करत असातना कोसळले आणि त्यांच्या त्यामध्ये मृत्यू झाला. त्यांना इतर लोकांनी उठवण्याचा आणि वाचवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

"बस आज की रात है जिंदगी... यम्मा यम्मा" या गाण्यावर दिक्षित आणि त्यांचे इतर सहकारी डान्स करत होते. हा कार्यक्रम सुरू असताना तेथील एका व्यक्तीने या प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आहे. हा थरारक व्हिडिओ पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

Igatpuri Tunnel Latest Update : समृद्धी महामार्गावर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट! इगतपुरी बोगदा 'या' वेळेत बंद राहणार, काय आहे कारण?

Marathi News Live Updates : सुशिक्षित पूर्वज असल्याने आदिवासी दावा नाकारता येणार नाही, उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

SCROLL FOR NEXT