CCTV Footage Viral Sakal
Trending News

मॉलच्या टॉयलेटमध्ये घुसले दरोडेखोर; बंदुकीचा धाक दाखवून बूट चोरले, CCTV Footage Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर चोरीचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी कधी सशस्त्र दरोडा तर कधी हल्ला करून दरोडा टाकला जातो. नकळत एखादी वस्तू दुकानातून चोरून नेल्याच्या घटनासुद्धा अनेकदा घडल्या आहेत. पण बंदुकीचा धाक दाखवून थेट तीन जणांचे बूट चोरून नेल्याची घटना पहिल्यांदाच ऐकली असेल. हे ऐकून आपल्यालाही हसू आवरणार नाही.

ही घटना कॅलिफोर्निया देशात घडली असून तेथील इरविन या शहरातील एका शॉपिंग मॉलमध्ये दोन चोरटे घुसले होते. त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून तेथील टॉयलेटमध्ये असलेल्या तीन व्यक्तींच्या पायातील बूट काढायला सांगितले आणि घेऊन गेले. बाहेर पडताना ते वेगाने धावत होते. हे थरारक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, मॉलमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपले गेले असून त्यानुसार पोलिसांनी त्यांची ओळख पटवली आणि त्यांच्यावर कारवाई केली आहे. पोलिसांनीच त्यांचा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर केला असून त्या दरोडेखोरांवर कारवाई केल्याचं सांगितलं आहे. तर हा व्हिडिओ नेटकऱ्यांनी चांगलाच शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

D.K. Shivkumar: डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रियांका गांधींचा मोठा रोल; इनसाइड स्टोरी आली समोर

Crude Oil: होर्मुझ तणावात भारताचा 'ऑइल मास्टरस्ट्रोक’! कच्चे तेल आणण्यासाठी नवा मार्ग; रशिया ठरला गेमचेंजर...

Latest Marathi News Live Update : नीटची परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या

Koyna Dam : कोयना धरणाची पाणीपातळी खालावली; सातारा-सांगलीसह संपूर्ण राज्याची धाकधूक वाढली, 'महाजनकोची' वीजनिर्मिती बंद पडल्यास काय होणार?

Chanakya Life Guide : लोक अचानकपणे तुम्हाला इज्जत देणं का बंद करतात? तुमचं कुठं चुकतं पाहा

SCROLL FOR NEXT