king cobra kiss viral video esakal
Trending News

Cobra Kiss Viral Video : पठ्ठयानं चक्क किंग कोब्राला केलं किस; खतरनाक व्हिडिओ होतोय तुफान व्हायराल

Trending Viral Video Cobra Kiss : अंगावर काटा आणणाऱ्या व्हायरल व्हिडिओत एका धाडसी व्यक्तीने विषारी किंग कोब्राच्या डोक्यावर चुंबन घेतल्याचे दिसत आहे.

Saisimran Ghashi

Viral Video : सोशल मीडियावर भीतीचे वादळ निर्माण करणारा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अंगावर काटा आणणाऱ्या व्हायरलव्हिडिओत एका धाडसी व्यक्तीने विषारी किंग कोब्राच्या डोक्यावर चुंबन घेतल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ प्रसिद्ध वन्यजीव प्रेमी माईक होल्सटन यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, यातून इंटरनेटवर भीती आणि कौतुकाची लाट उसळली आहे. काहींनी या कृतीला "वेडेपणा" म्हणत नापसंती दर्शवली आहे, तर काहींनी होल्सटन यांच्या निर्भीडतेचं कौतुक केलं आहे.

व्हिडिओत दिसतं की, होल्सटन किंग कोब्राशी सामना करत असताना अत्यंत तणावपूर्ण स्थितीत आहेत. सापाच्या जबड्यापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याने नागाला हाताने पकडलेलं आहे. नागाने अचानक हल्ला केला असता, होल्सटन त्या हल्ल्याचा सहज बचाव करतात आणि परत त्या सापाला डोक्यावर चुंबन घेतात. ही दृश्ये पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत. व्हिडिओवर १९ लाखपेक्षा जास्त व्ह्यूज आले असून, नेटिझन्समध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

काहींनी या कृतीला धाडसाचे कौतुक करत “वेडेपणा आहे, असे धाडस कोण करेल?” अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर काहींनी याला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून धोकादायक म्हणत टीका केली आहे. एका यूजरने लिहिले, "हे वेडेपण आहे! मी तर स्क्रीनवर पाहण्याची हिम्मत सुद्धा करू शकलो नाही.”

आश्चर्यकारक दृश्यांनी भारलेले नेटिझन्स प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय बनलेल्या या व्हिडिओने विविध प्रतिक्रिया मिळवल्या आहेत. हा व्हिडिओ पाहून जुन्या व्हायरल व्हिडिओची आठवण काढली जात आहे. अशीच एक घटना पूर्वीही घडली होती. निक द रँग्लर नावाच्या एका वन्यजीव प्रेमींने १२ फूट लांबीच्या किंग कोब्राला शांतपणे डोक्यावर चुंबन घेतलं होतं. त्याने सापाला सांभाळत पोज दिली होती, ज्यामुळे त्याचंही व्हिडिओ व्हायरल झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Heritage status: शिवरायांच्या किल्ल्यांना 'युनेस्को'चा दर्जा मिळण्यास का लागतोय वेळ? गडांच्या व्यवस्थापनावर समितीने ठेवलं बोट

Mumbai News: जैन मंदिरावरील कारवाई योग्यच, उच्च न्यायालयाने ट्रस्टचे अपील फेटाळले

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT