Video Sakal
Trending News

अशीही कृतज्ञता! फ्लेमिंगोवर फक्त एकदाच उपचार केला होता, पण...; काळजाला हात घालणारा Video

हा पक्षी कायम त्याच्यासोबत असतो.

सकाळ डिजिटल टीम

आपण एखाद्यावर उपकार केले आणि त्याने त्या उपकाराची परतफेड केली तर त्याला कृतज्ञता म्हणतात. पण सध्या कृतज्ञता असणारे कमी लोकं पाहायला मिळतात. मुके प्राणी आपल्यावर केलेले उपकार विसरत नसतात. सध्या असाच एका पक्ष्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एका व्यक्तीने जखमी झालेल्या फ्लेमिंगोवर एकदा उपचार केले होते. त्यानंतर हा पक्षी त्या व्यक्तीला सोडायलाच तयार नाही. सदर व्यक्तीने हा व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करत सांगितलं की, "ही आमची जय विरूची जोडी आहे" यामध्ये व्यक्ती गाडीवर चालला असून हा पक्षी त्याच्यासोबत उडताना दिसत आहे. काळजाला हात घालणारा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

सदर घटना उत्तरप्रदेशातील अमेठी येथे घडली असून मोहम्मद अरिफ असं या तरूणाचं नाव आहे. त्याने मागच्या वर्षी जखमी झालेल्या फ्लेमिंगोवर उपचार केले होते. त्यानंतर या पक्षाने त्याची साथ कधीच सोडली नाही. तो कायम त्याच्यासोबत असतो.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिंदेंच्या आमदाराचा फुकटचा राडा, कँटिन नाहक बदनाम; अन्न आणि औषध प्रशासनाकडून क्लीन चीट

Nandwal Dance Party Clash : करवीर तालुक्यात पार्टीदरम्यान नृत्यांगना नाचवल्याने गावात खळबळ; तरुणांमध्ये वादावादी, पोलिसांचा हस्तक्षेप

Diwali Recharge Offer : दिवाळी स्पेशल 1 रुपयचा रिचार्ज! रोज 2GB डेटा, कॉलिंग, SMS अन् महिन्याची वैधता, बड्या कंपनीने आणली धमाका ऑफर

Pune News : पुण्यात मुख्यमंत्री, संरक्षणमंत्र्यांच्या कार्यक्रमस्थळी साप; उपस्थितांचा उडाला गोंधळ

संकर्षण कऱ्हाडेंनी घेतली नितिन गडकरी यांची भेट, भेटीदरम्यान मिळाली खास भेट, अभिनेता म्हणाला...

SCROLL FOR NEXT