Man Risks Lives with Car Roof Stunt, Video Goes Viral; Police Take Action esakal
Trending News

Mumbai Car Stunt Viral Video : खतरनाक स्टंट! गाडी चालवत चालवत थेट कारवर चढला; व्हिडिओ होतोय व्हायरल

Car Stuntman in Mumbai : पांढरी स्विफ्ट, राजस्थानची नंबर प्लेट ; मुंबई पोलीस ऍक्शनमध्ये

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Viral Video : सोशल मिडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती धावत्या कारच्या चालकाच्या सीटवरून बाहेर येऊन गाडीच्या वर छप्परवर उभा असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर मुंबई पोलीसांनी तात्काळ कारवाई सुरु केली आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, हा व्यक्ती राजस्थानच्या नंबर प्लेट असलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडी चालवत आहे. पुढे तो गाडी चालू ठेवूनच दरवाजा उघडतो आणि बाहेर येऊन गाडीच्या रूफवर चढतो. धावत्या गाडीच्या वर तो उभा राहतो आणि कोणीही स्टिअरिंग हाताळत नसल्याचेही व्हिडीओमध्ये दिसत आहे.

हा व्हिडीओ २८ मे रोजी सोशल मिडियावर पोस्ट करण्यात आला आणि आतापर्यंत त्याला ११ लाखांहून अधिक लोकांनी पाहिले आहे. या व्हिडीओवर अनेक जणांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मुंबई ट्रॅफिक पोलीसांनी या व्हिडीओची दखल घेतली असून त्यांनी या प्रकरणी जळावर पोलीस आणि राजस्थान पोलीसांना टॅग केले आहे.

झालावाड पोलीसांनी हिंदीमधून केलेल्या कमेंटचे इंग्रजीमध्ये भाषांतर करताना ते म्हणाले, "मुंबई पोलीसांनी या व्हिडीओची दखल घेतली आहे आणि संबंधित पोलीस स्टेशनला या व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत."

tar ekane या व्हिडीओवर लोकांनी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत की "जीवन हे स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि देशासाठी खूप मौल्यवान आहे. अशा प्रकारे जोखीम घेऊन ते वाया घालवू नये!" तर एकाने लिहिले"सोशल मीडियावर फक्त व्ह्युज / फॉलोअर्स मिळवण्यासाठी लोक आपल्या आणि इतरांच्या जीवांची जोखीम का घेतात? अशा कृत्यांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून काही कठोर कारवाई करायला हवी."

काही कॉमेंट्समध्ये ड्रायविंग लायसन्स रद्द करण्याची मागणी करत पुणे पोर्श अपघाताचा संदर्भ देखील जोडला आहे.

तर दुसऱ्या युजरने म्हणले आहे, "गाडीचा रंग बदललेला, गाडीवर काळी फिल्म आणि असावध गाडी चालवणे. हा तर जेलची हवा खायलाच हवी."

मुंबई पोलीसांनी या प्रकरणी त्वरित कारवाई केल्याचे पाहायला मिळत आहे. अशा प्रकारच्या धोकादायक कृत्यांमुळे स्वतः आणि इतरांच्या जीवाना धोका होऊ शकतो, याची नागरिकांना जाणीव करून देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT