Viral Video
Viral Video Sakal
Trending News

CCTV Footage : गाडी चोरली, पेट्रोल भरायला पंपावर आणली; पाठीमागून मालक आला अन्... | घटना कॅमेऱ्यात कैद

सकाळ डिजिटल टीम

चोरीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. तर सध्या एका चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये चोर पळून गेल्याचा थरार पाहायला मिळत आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यातील एका चोराला जागेवर पकडण्यात आलं आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील असून त्यामध्ये दोन चोरांनी एक दुचाकी चोरून आणली आहे. पेट्रोल टाकण्यासाठी ते एका पंपावर थांबले आहेत. ते आल्यानंतर पेट्रोल टाकण्यासाठी जवळ येतात आणि तेवढ्यात पाठीमागून एक चारचाकी गाडी येते.

एका चोराला पकडण्यात यश

पाठीमागून आलेल्या चारचाकी गाडीतून तीन ते चार लोकं उतरतात आणि ते दुचाकीवरील चोराला पकडण्याचा प्रयत्न करतात. पण चोरांना अंदाज आल्यावर त्यातील एकजण पळून जाण्यास यशस्वी होतो. पण गाडीतील चार लोकं दुचाकीवरील एका चोराला पकडतात. त्यामुळे त्यांचा चोरीचा प्रयत्न अयशस्वी होतो.

सावधगिरी बाळगली पाहिजे

प्रत्येकाने आपली गाडी किंवा वस्तू संभाळून ठेवली पाहिजे. दुचाकीचे हँडेल लॉक केले नाही तर ती चोरी जाण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी चोरांना चोरी करण्यासाठी सोपे होते त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या सामानाची आणि वस्तूंची काळजी घेणे गरजेचे आहे.

व्हिडिओ चांगलाच व्हायरल

सध्या या सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या व्हिडिओला सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "मोदी आता गल्ली-बोळातही रोड शो करतील..." राज्यातील प्रचारसभांवरून ठाकरेंचा पंतप्रधानांना टोला

Rahul Gandhi Accepts Challenge: आव्हान स्वीकारलं! PM मोदींसोबत जाहीर चर्चेसाठी राहुल गांधी तयार, म्हणाले, 'पण ते...'

Kolhapur Rain : कोल्हापूरसह कागल, इचलकरंजी, गडहिंग्लज, शिरोळमध्ये दमदार पाऊस; 'इतक्या' लाखांचं नुकसान, आजही पावसाची शक्यता

International Nurses Day 2024 : जिच्यासाठी आंतरराष्ट्रीय परिचारीका दिवस साजरा केला जातो ती फ्लोरेंस नाइटेंगल कोण होती?

दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणी आणखी एका भारतीयाला अटक, कॅनडा पोलिसांनी आतापर्यंत ४ जणांना घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT