Marathi Announcement sakal
Trending News

Marathi Announcement : 'बंधू आणि भगिनींनो...'; SpiceJet च्या विमानात सहचालिकेने केली मराठीत उद्घोषणा | Video Viral

या उद्घोषणेनंतर प्रवाशांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्याहून गोवा येथे जाणाऱ्या स्पाईस जेटच्या एका सहचालिकेने विमानातील प्रवाशांसमोर मराठी उद्घोषणा केली आहे. पुण्याहून उड्डाण करण्याच्या अगोदर ही उद्घोषणा केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. महाराष्ट्रातून उड्डाण होणाऱ्या प्रत्येक विमानात मराठीतून उद्घोषणा झाली पाहिजे अशी मागणी मराठी एकीकरण समितीने केली आहे.

दरम्यान, संजना अमृते असं या विमान सहचालिकेचे नाव आहे. त्यांनी बंधू आणि भगिनींनो असं म्हणत आपल्या मराठी उद्घोषणेची सुरूवात केली आहे. मुख्य विमान चालक मोहीत कुमार हे असून संजना अमृते या सहचालिका आहेत. पायलट कवी अशी त्यांची इंस्टाग्रामवर ओळख असल्याचंही संजना यांनी सांगितलं.

मराठी एकीकरण समितीने आपल्या ट्वीटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट केला असून प्रत्येक विमानात अशा प्रकारची मराठीतून उद्घोषणा झाली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनीही त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादळ! उमेदवारीवरून खदखद वाढली; पक्षातच बंडाची चिन्हं

Video Viral : वैभव सूर्यवंशीने 'सेल्फी'साठी लहान मुलांकडे मागितले प्रत्येकी १०० रुपये; सोशल मीडियावर रंगलीय याची चर्चा...

Amazon चा मोठा प्लॅन! 100 शहरांमध्ये Quick Commerce विस्तार; 16,000 शेतकऱ्यांना जोडणार, ऑपरेशन्ससाठी 2,800 कोटींची गुंतवणूक जाहीर

Latest Marathi News Live Update : खरिपाच्या तोंडावर कृषी सेवा केंद्रांचा संप

भोंदूबाबा मनोहर मामा देत होता 'त्या' मराठी मालिकेला फंडिंग? मराठी अभिनेत्यानेच फोडलं बिंग, पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT