Viral Video Sakal
Trending News

Viral Video : MSEB अधिकारी वीज तोडायला शेतात आले; मराठी शेतकऱ्याने इंग्रजीत झापलं

या वृद्ध शेतकऱ्यांचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

सांगली : वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज महामंडळाच्या अधिकाऱ्याशी शेतकऱ्याने चक्क इंग्रजीतून संवाद साधला आहे. सांगली तालुक्यातील आटपाडी येथील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. वेताळ चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

दरम्यान, महावितरण विभागाने शेतीसाठी असलेल्या लाईटची चोरी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तर अभियंता सुनील पवार हे आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी येथे तपासणीसाठी आले असता शेतकरी वेताळ चव्हाण यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला आहे. हा व्हिडिओ महावितरण अधिकाऱ्याने शूट केला आहे.

या व्हिडिओमध्ये शेतकरी आपली बाजू चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यासमोर मांडताना दिसत आहेत. "मी अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली पण साहेब माझे ऐकून घेत नाहीत" असं शेतकरी इंग्रजीतून बोलताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ पाहून आपणही थक्क व्हाल. या आजोबांची कमालंच आहे असं मत अनेक युजर्सने व्यक्त केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: पेपर लीकविरोधात 'कॉकरोच जनता पार्टी'चा एल्गार! आंदोलनासाठी परवानगी कशी मिळते? जाणून घ्या प्रक्रिया

Diesel Selling : कॅनमध्ये डिझेल विक्रीला बंदी; व्यावसायिकांसह वाहनचालकांची गैरसोय

Bhor News : माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे निधन

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT