Viral Video Sakal
Trending News

बाप रे! नवरदेवाने नवरीऐवजी मेहुणीच्या गळ्यात घातला हार; घडलं महाभारत | Video Viral

ही घटना पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

सकाळ डिजिटल टीम

लग्न समारंभ निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रत्येक नवरीचा वडील प्रयत्न करत असतो. समारंभासाठी आलेले पाहुणेमंडळी, मित्रमंडळी व्यवस्थितरित्या पोहोचले का? जेवले का? याची काळजी फक्त नवरीच्या वडिलांना असते. पण काही लग्न समारंभामध्ये काहीतरी विपरीत घडत असतं. अशा गोष्टींवर आपण विश्वास देखील ठेवू शकत नाही.

सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये लग्न लागल्यानंतर नवरदेव नवरीऐवजी नवरीशेजारी उभी असलेल्या मेहुणीच्या गळ्यात हार घालतो. हे चित्र पाहून नवरीसुद्धा आश्चर्यचकित झाली असून या समारंभासाठी उभे असलेल्या पाहुण्यांनासुध्दा धक्का बसला आहे. या घटनेनंतर मेहुणीही आश्चर्यचकित झाली आहे.

दरम्यान, मेहुणीला हार घातल्यानंतर नवरदेवा तिचा हात हातात घेण्याचा प्रयत्न करतो. तर मेहुणी तिच्या गळ्यातील हार काढून नवरदेवाकडे देण्याचा प्रयत्न करते. तिच्या हातात ओवाळणीसाठी तयार करण्यात आलेले ताट आहे.

तर शेजारी उभ्या असलेल्या महिलांनासुद्धा काय होतंय ते कळत नसल्यामुळे त्या चलबिचल झाल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेक नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT