Video Sakal
Trending News

Video: मेक्सिकोत अंदाधुंद गोळीबारात 18 ठार; घटनेचा थरारक व्हिडिओ आला समोर

सकाळ डिजिटल टीम

मेक्सिको : मेक्सिको येथील सिटी हॉलमध्ये सामूहिक गोळीबार झाला असून त्यात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तेथील महापौरांचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. तर या घटनेचा थरारक व्हिडिओ समोर आला असून हा व्हिडिओ पाहून आपल्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

(Mexico Firing Viral Video)

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओ मध्ये एक व्यक्ती गोळीबार करताना दिसून येत असून तीन ते चार व्यक्ती खाली कोसळलेले दिसत आहेत. या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला. गोळीबारात महापौरांव्यतिरिक्त त्यांचे वडील, माजी महापौर आणि महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मेक्सिकन सिटी हॉलमध्ये कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमादरम्यान एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये प्रवेश केला, काही वेळ थांबून त्याने अचानक अंदाधुंद गोळीबार करायला सुरवात केली. तर या गोळीबारात 18 जणांचा मृत्यू झाला असून हा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : सामनाही गमावला अन् आता BCCIचा कारवाईचा बडगा... हार्दिक पांड्याची दुतर्फा गोची, पुन्हा असं केल्यास बंदी?

स्वरांच्या युगाचा अंत ! आशाताई भोसले अनंतात विलीन, शासकीय इतमामामात पार पडले अंत्यसंस्कार

ICC चा मोठा धमाका! टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी विक्रमी बक्षीस रकमेची घोषणा; IPL लाही टक्कर देत रकमेत १० पट वाढ

Shahajibapu Patil: तर शिवसेनेचे ५-६ आमदार निवडून येतील: शहाजीबापू पाटील, सोलापूरमध्ये तानाजी सावंत यांना लक्ष घालायला सांगा!

IPL 2026 : टीम डेव्हिडची सर्व 'मस्ती' उतरवली; मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात अम्पायरने समाजावूनही ऐकला नाही, आता... Video

SCROLL FOR NEXT