Viral Video Sakal
Trending News

Viral Video : माकडांपासून सावधान! पार्किंग केलेल्या ऑडीची केली तोडफोड

सकाळ डिजिटल टीम

आपण कधी फिरायला गेलो की बऱ्याच ठिकाणी माकडांचा वावर आपल्याला पाहायला मिळतो. तर अनेकवेळा ही माकडं पर्यटकांना त्रास देतात. त्यामुळे अशा माकडांपासून सावधान राहिलं पाहिजे. तर एका महागड्या गाडीची तोडफोड करणाऱ्या माकडांचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

(Monkey Viral Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दोन माकडं एका ऑडी गाडीची नंबर प्लेट आणि वायफर तोडताना दिसत आहेत. त्याचबरोबर गाडीवर उड्या मारत तोडफोड करत आहेत. ही गाडी पार्किंगमध्ये आहे पण माकडांच्या उच्छादामुळे या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, युकेमधील वेस्ट मिडलँड सफारी पार्कमधील हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर आली आहे. तर हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. अशा उच्छादी माकडांपासून सावधान राहणे गरजेचे आहे, नाहीतर आपल्याही वस्तूंचे नुकसान होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Palkhi Route Development : संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील कामाला गती

Pune Traffic: वडगाव घेनंद घाटात अवजड वाहन बंद; भर पावसात पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडवली.

Tomato Rate : नारायणगावात टोमॅटोच्या भावात घसरण; उपबाजारात हंगामातील उच्चांकी ६० हजार टोमॅटो क्रेटची आवक

CET Exam Result : सीईटी परीक्षेत बारामतीचा डंका, दोन विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल

Uddhav Thackeray: ''मी सतत लोकांना भेटलो तर माझी किंमत उरणार नाही'', उद्धव ठाकरे 'त्या' मुलाखतीत काय म्हणाले होते?

SCROLL FOR NEXT