Python Video Sakal
Trending News

Python Video : सावधान! पावसाळ्यात फिरायला जाताय? झोप उडवणारा हा व्हिडिओ पाहा

धबधब्याच्या ठिकाणी महाकाय अजगर आढळला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकजण धबधबे आणि पर्यटनस्थळी फिरायला जात असतात. पण पावसाळ्यामध्ये अशा ठिकाणी किंवा ट्रेकिंग करताना जंगलातील सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सावध राहिले पाहिजे. साप, अजगर, किडे किंवा इतर प्राणी यावेळी आपल्यावर हल्ला करू शकतात.

दरम्यान, जंगलामध्ये अनेकदा प्राण्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्याचे प्रकार समोर आले आहेत. पण सध्या एक व्हिडिओ समोर आला असून त्यामध्ये धबधब्याच्या ठिकाणी महाकाय अजगर आढळला आहे. आजूबाजूला पर्यटक धबधब्यातील पाण्याचा आनंद घेत आहेत तर शेजारीच असलेल्या दगडावर अजगर दिसला आहे. हे दृश्य पाहून आपल्यालाही धक्का बसेल.

काळजी घेणे आवश्यक

हा व्हिडिओ भारताबाहेरील असल्याचं सांगण्यात येत आहे. पण आपण फिरायला जातो त्या ठिकाणीसुद्धा असे प्राणी आढळू शकतात. त्यामुळे पर्यटकांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. तर अज्ञात स्थळी ट्रेकिंगला जात असाल तर अनुभवी व्यक्ती साथीला घेतली पाहिजे. पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका असतो त्यामुळे धोकादायक ठिकाणी जाणे पावसाळ्यात टाळले पाहिजे.

सेल्फीच्या नादात पर्यटनस्थळावर अनेकांचा मृत्यू

रील किंवा फोटो काढण्याच्या नादामध्ये दरडावरून तोल जाऊन किंवा पाय घसरून सुद्धा पर्यटकांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत, त्यामुळे या गोष्टी पर्यटकांनी लक्षात ठेवायला हव्यात आणि आपल्यासोबत असलेल्या लहान मुलांची जबाबदारी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT