Crime  Sakal
Trending News

Crime : जन्मदातेच उठले जिवावर! आयफोन घेण्यासाठी 8 महिन्याच्या पोटच्या लेकराला विकलं

बाळाला विकल्यानंतर मुलीलाही विकण्याचा होता प्रयत्न

दत्ता लवांडे

कोलकत्ता : पश्चिम बंगालमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रील बनवण्यासाठी आयफोन घ्यायला पैसे नसल्यामुळे नराधम मातापित्याने आपल्या आठ महिन्यांच्या बाळाला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. बाळाला विकल्यानंतर दुसऱ्या मुलीलाही विकण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील उत्तर परगणा जिल्ह्यातील पानिहाटी येथील गांधीनगर मध्ये सदर दाम्पत्य आपल्या आईवडिलांसोबत आणि दोन मुलांसोबत राहत होते. साथी कनई असं आरोपी महिलेचं नाव असून जयदेव असं तिच्या पतीचं नाव आहे. ते मोलमजुरी करून उदर्निवाह भागवतात. त्यांना एक आठ महिन्याचं बाळ आणि एक मुलगी आहे.

पण एके दिवशी अचानक त्यांच्याकडे महागडा आयफोन आल्यामुळे शेजारचे चकीत झाले. तर ही महिला रील बनवण्यासाठी फिरत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्याचं आठ महिन्याचं बाळही दिसत नसल्याने विचारणा केली असता त्यांना स्पष्ट उत्तर देता आलं नाही त्यामुळे शेजाऱ्यांचा संशय बळावला.

शेजाऱ्यांच्या दाबावानंतर पैशासाठी बाळाला विकलं असल्याचं या नराधम मातापित्याने कबूल केलं. बाळाच्या बदल्यात पैसे घेतल्याचं त्यांनी सांगितलं. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला आणि बाळ विकत घेणाऱ्या महिलेला अटक केली असून आरोपी पिता फरार आहे. पोलिसांकडून बाळाची सुटका करण्यात आली आहे.

दरम्यान, आठ महिन्याच्या बाळाची विक्री केल्यानंतर मध्यरात्री या दाम्पत्याने मुलीलाही विक्री करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात आल्यानंतर शेजाऱ्यांनी ही माहिती पोलिसांना दिली असं स्थानिक नगरसेवक तारक गुहा यांनी सांगितलं. याप्रकरणी अधिकचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat Pakistan Dialogue : आपण हिटलर नाही,पाकिस्तानशी संवादाचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत; मोहन भागवतांचे वक्तव्य चर्चेत

लोक खातात म्हणून विकतात, गुटखा विक्रेत्यांवर मकोका लावण्यावर मंत्र्यांचं अजब विधान; म्हणाले, अंगाशी येईल, कारवाईऐवजी....

Rahmanullah Gurbaz: गौतम गंभीरकडून घेतल्या टिप्स, अन् भारतीय गोलंदाजांवरच तुटून पडला; शतकानंतर गुरबाज म्हणाला...

Latest Live Updates Marathi: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्रीक्षेत्र भीमाशंकर भेट; विकास आराखड्याच्या कामांची पाहणी

Pune: केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्या हस्तक्षेपामुळे ७५ अमरनाथ यात्रेकरूंचा मार्ग मोकळा; विमान रद्द झाल्यानंतर तातडीने उपलब्ध करून दिली पर्यायी व्यवस्था

SCROLL FOR NEXT