Mother And Son Sakal
Trending News

पुरामुळे मायलेकरांची तब्बल 35 वर्षानंतर झाली भेट; 2 वर्षाचा असताना झाली होती ताटातूट | Mother and Son

दोन वर्षाचा असताना झाला होता वडिलांचा अपघात, आजीआजोबांनी केला संभाळ पण मनात रूखरूख कायम होती

दत्ता लवांडे

पटियाला : पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी गेलेल्या एका तरूणाला आपली खरी जन्मदाती आई सापडल्याची भावनिक घटना पंजाबमधील पटियाला येथे घडली. तब्बल ३५ वर्षापूर्वी या मायलेकरांमध्ये ताटातूट झाली होती. मुलगा जगजीत सिंग आणि आई हरजित कौर असं त्यांचं नाव असून आता या मायलेकरांचे पुनर्मिलन झाले आहे.

अधिक माहितीनुसार, जगजीत सिंग यांच्या आईवडिलांचा लहानपणी अपघाती मृत्यू झाल्याचं त्याला त्याच्या आजी आजोबांकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्याने आत्तापर्यंत त्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवला होता. त्यानंतर सध्या भाई घनैया यांच्या एका संस्थेसोबत पुरात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी जगतीज सिंग स्वयंसेवक म्हणून काम करत होता.

यावेळी त्याच्या काकूने त्याला सांगितले की, तुझे आईवडील पटियालातील बोहरपूर येथे राहतात. जगजीतला आपली आई जिवंत असल्याचं मागच्या पाच वर्षापासून माहिती होतं पण पुराच्या निमित्ताने त्याला आपल्या आईचा शोध घेण्याची संधी मिळाली होती. त्याने बचावकार्य करता करता आईचा शोध सुरू केला आणि अखेर या मायलेकरांची तब्बल ३५ वर्षानंतर भेट झाली.

दरम्यान, जगजीत हा अवघा दोन वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या आईने दुसरं लग्न केलं आणि जगजीतला सांभाळण्याची जबाबदारी त्याच्या आजीआजोबांनी घेतली. पुढे त्याच्या आजीचा मृत्यू झाला. जगजीत दहावीला असताना त्याने घरातील जुना फोटो अल्बम काढला आणि हे कोण आहे असं विचारलं असता, त्याच्या आजोबांनी सांगितलं की, तुझ्या आईवडिलांचा एका अपघातात मृत्यू झालाय.

जगजीतची खरी आई जिवतं असल्याची बाब त्याच्या सर्व नातेवाईकांनी लपवून ठेवली होती. कालांतराने आजोबाचाही मृत्यू झाला पण त्याला त्याच्या काकूने सांगितलं की, त्याची आई जिवंत आहे, तिने दुसरं लग्न केलं आहे. ही गोष्ट त्याला मागच्या पाच वर्षापासून माहिती होती. या काळात त्याने अनेकदा आपल्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न केला होता.

यावर्षी आलेल्या पुरामध्ये बचाव पथकामध्ये तो काम करत असताना बोहरपूर येथे त्याची आई असल्याचं त्याला समजलं आणि त्याने शोध सुरू केला. अनेकांच्या मदतीने तो त्याच्या खऱ्या जन्मदात्या आईपर्यंत पोहचू शकला. २० जुलै रोजी या मायलेकरांची तब्बल ३५ वर्षाच्या ताटातुटीनंतर भेट झाली असून हा भावनिक क्षण त्याने फेसबुकवर शेअर केला. मायलेकरांच्या पुनर्मिलनाची स्टोरी ऐकून अनेक नेटकरी भावनिक झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Shakti: शक्ती चक्रीवादळ कुठे पोहोचले? धोका नेमका कधी टळणार? हवामान खात्याकडून तारीख जाहीर

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

SCROLL FOR NEXT