Mother and Son Sakal
Trending News

आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते! किडनी विकण्यासाठी अल्पवयीन मुलगा पोहोचला हॉस्पिटलमध्ये | Mother and Son

या मुलाला वडील नाहीत, त्याच्या आईचे दोन्ही पाय तुटले आहेत पण त्याच्याकडे उपचारासाठी पैसे नाहीत.

सकाळ डिजिटल टीम

रांची : बिहार येथील एक मुलगा आपल्या आईच्या आजारावरील उपचारासाठी पैसे मिळावेत यासाठी झारखंड राज्यातील रांची येथे किडनी विकण्यासाठी पोहोचला आहे. त्याच्याकडे आईच्या उपचारासाठी पैसे नसल्याचं त्याने सांगितलं आहे. तर रांची येथील रिम्स हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सदर मुलाच्या आईचा मोफत उपचार करण्याचे आश्वासन दिले आहे.

बिहार येथील गया जिल्ह्यातील एक अल्पवयीन दिपांशूची मुलाची आई आजारी आहे. तो आपल्या जीवापेक्षा आईवर जास्त प्रेम करतो. त्याचे वडील या जगात नसल्यामुळे त्याच्या आईच्या आजारपणाची सगळी जबाबदारी त्याने घेतली.

तो त्यासाठी बिहारमधून रांची येथे येऊन एका हॉटेलमध्ये काम करत होता पण त्याला एके दिवशी अचानक कळलं की आपल्या आईचे दोन पाय तुटले आहेत. पण त्याच्याकडे आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते. त्याने मग झारखंडमधील रांची येथील रिम्स हॉस्पिटल गाठलं.

त्याने किडनी विकायचं ठरवलं होतं. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याला किडनी विकत घेणारा ग्राहक सापडला नाही पण त्याची भेट तेथील डॉक्टर असलेल्या विकास कुमार यांच्याशी झाली. पण डॉक्टरांनी या मुलाची कहानी ऐकून त्याच्या आईचा उपचार मोफत करून देण्याची ग्वाही दिली आहे.

दरम्यान, आपल्या आईच्या उपचारासाठी स्वत:ची किडनी विकण्यासाठी तयार झालेल्या या मुलाची स्टोरी पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येईल. ज्या मातेने आपल्याला जन्म दिला, तिला संभाळण्याची पूर्ण जबाबदारी आपली असून तिच्यासाठी जीव द्यायलाही तयार असलेल्या दिपांशूचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकचा खरा चेहरा पुन्हा उघड! शोएब अख्तरच्या भावाच्या अंत्यविधीत दहशतवाद्यांची उपस्थिती; पहलगाम हल्ल्याचा सूत्रधारही दिसला

Ravichandran Ashwin: वैभव सूर्यवंशीबाबत अश्विनचे मोठे विधान; 'पाणी द्यायलाही तयार राहा' म्हणत दिला खास सल्ला!

Mumbai Police: सामूहिक विषप्रयोगाचा कट उधळला! विषाने भरलेल्या १४ हजार ९०० कॅप्सुल्स जप्त; मोहरमच्या मिरवणुकीत धक्कादायक प्रकार

Degloor News : जिल्हा बँकेच्या उमेदवारीसाठी देगलूरात भाजपची चाचपणी; आमदार अमर राजूरकरांचा दौरा

Latest Marathi News Live Update : ...तर माझे खासदार का फोडले- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT