Viral Video
Viral Video Sakal
Trending News

"...चं नाव घेतो सर्वांनी वीजबील भरा आणि सहकार्य करा" MSEB कर्मचाऱ्याचा उखाणा Viral| Video

सकाळ डिजिटल टीम

काहीजण आपल्या कामाविषयी खूप सजग असतात. ते कुठेही गेले तरी आपल्या कामाविषयी लोकांना सांगत असतात. तर सध्या एका महावितरण कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो आपल्या लग्नात आगळावेगळा उखाणा घेताना दिसत आहे. तर या कर्मचाऱ्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ हा नांदगाव येथील असल्याची माहिती आहे. नांदगाव येथे कार्यरत असलेले महावितरणचे सहाय्यक अभियंता अतुल पैठणकर यांनी लग्नाच्या मंगल प्रसंगी उखाण्याच्या माध्यमातून जनजागृती केली आहे. त्यांनी घेतलेल्या उखाण्यात ते लोकांना वीजबील भरून सहकार्य करण्यास सांगताना दिसत आहेत.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून पसंती मिळत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून लाईक केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओ आपल्याला खूप काही शिकवून जात असतात.

सोशल मीडियावर अनेक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये विनोदी व्हिडिओ, डान्स व्हिडिओ, लग्नातील व्हिडिओ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओचा सामावेश असतो. सध्या सोशल मीडिया हे तरूणांच्या मनोरंजनाचे साधन बनले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs CSK Live Score: फाफ डू प्लेसिसचा भन्नाट कॅच अन् धोनीला 16 व्या ओव्हरलाच उतरावं लागलं मैदानात

Lok Sabha Election 2024: निवडणुकीदरम्यान 8,889 कोटींची रोकड, 4,000 कोटींचं ड्रग्ज जप्त! निवडणूक आयोगाची माहिती

Lok Sabha Election 2024 : रायबरेली, अमेठीत प्रचाराचा धडाका! राहुल गांधी विरुद्ध ‘स्थानिक’ असा तडका

Video: अत्यंत संतापजनक! भर बाजारात अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन; व्हिडिओ पाहून तुम्हालाही येईल राग!

RCB vs CSK: सँटेनरनं बॉलला स्पर्श केला अन् डू प्लेसिस रनआऊट झाला, पण विकेट अडकली वादाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT