Viral Farmer Video Sakal
Trending News

Viral Farmer Video: शेतकऱ्याचा नाद खुळा! काल MSEB अधिकाऱ्याला इंग्रजीत झापलं अन् आज विभागाने मीटर जोडलं

या वयस्कर शेतकऱ्याने महावितरण विभागाला चांगलाच धडा शिकवला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral Farmer Video: वीज कनेक्शन तोडण्यासाठी आलेल्या वीज महामंडळाच्या अधिकाऱ्याशी शेतकऱ्याने चक्क इंग्रजीतून संवाद साधला असल्याची घटना घडली होती. सांगली तालुक्यातील आटपाडी येथील ही घटना असून या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

वेताळ चव्हाण असं या शेतकऱ्याचं नाव असून या घटनेनंतर महावितरण विभागाला जाग आली असून विभागाने एकाच दिवसात शेतकऱ्याचे मीटर जोडून दिलं आहे.

हेही वाचा - अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दरम्यान, महावितरण विभागाने शेतीसाठी असलेल्या लाईटची चोरी रोखण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. तर अभियंता सुनील पवार हे आटपाडी तालुक्यातील य.पा.वाडी येथे तपासणीसाठी आले असता शेतकरी वेताळ चव्हाण यांनी त्यांच्याशी इंग्रजीतून संवाद साधला होता.

हा व्हिडिओ महावितरण अधिकाऱ्याने शूट केला आहे. महावितरणने मीटर कनेक्शन तोडल्याची तक्रार शेतकऱ्याने सदर अधिकाऱ्याकडे केली होती. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तर या शेतकऱ्याने MA इंग्रजीचं शिक्षण घेतलं असल्याची माहिती आहे.

या व्हिडिओमध्ये शेतकरी आपली बाजू चांगल्या पद्धतीने अधिकाऱ्यासमोर मांडताना दिसत आहेत. "मी अनेकवेळा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली पण साहेब माझे ऐकून घेत नाहीत" असं शेतकरी इंग्रजीतून बोलत आहे.

वीज जोडून दिल्यावर काय म्हणाले शेतकरी आजोबा

मीटर जोडून देत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आहे. काल मी माझी अडचण सदर अधिकाऱ्याला सांगितली होती. त्यानंतर त्यांनी आज माझी अडचण सोडली आहे असं म्हणत वेताळ चव्हाण यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT