Mughal History esakal
Trending News

Mughal History: हाय गर्मी! भारतातला उन्हाळा तर बाबरलाही सहन नव्हता झाला, म्हणून महालात केलेले हे बदल

उन्हाळा लक्षात घेऊन राजवाडे,महालांचे बांधकामही केले गेले

सकाळ डिजिटल टीम

Mughal History: 

सध्या देशात सगळीकडे उन्हाच्या झळा वाढल्या आहेत. प्राणी-पक्षी, मनुष्य सगळेच यापासून बचावासाठी उपाय करत आहेत. भारतात अलिकडेच हा उन्हाळा वाढला आहे असे ज्यांचे मत आहे ते चुकीचे आहे. कारण,मुघल बादशहा बाबर जेव्हा भारतात आला तेव्हाही असाच कडक उन्हाळा होता. याचा उल्लेख बाबराने स्वत:च्या आत्मकथेत केला आहे.

‘बाबरनामा’ या पुस्तकात तो असे म्हणतो की, भारतात तीन गोष्टींनी त्यांना त्रास दिला. पहिली गोष्ट म्हणजे भारतातला उन्हाळा, दुसरा थंडगार वारा आणि तिसरे म्हणजे धूळ. बाबरने या समस्यांपासून बचावासाठी काही उपाय ही केले होते.

उष्णता, धूळ आणि कडाक्याच्या थंड वाऱ्यापासून वाचण्यासाठी बाबरने प्रथम राजवाड्यात स्नानगृहे बांधली. मुघल सम्राटाचा असा विश्वास होता की ते आपल्याला तिन्ही गोष्टींपासून वाचवू शकतात. मोठ्या  भिंतींमुळे हे स्नानगृह उन्हाळ्यात थंड राहते. थंडी पडली तर त्यामध्ये गरम पाणी घातला येईल.

पुढे तो असे म्हणतो की, ही स्नानगृह बांधण्याचा विचार माझ्या मनात आग्र्यातील यमुना नदी पार करताना आला होता. थंडीपासून बचाव करण्यासाठीचा छोटा तलाव सुद्धा या स्नानगृहात दगडांपासून बनवला होता.

त्याचे दोन भाग होते. पहिल्या भागात गरम पाणी होते. दुसरा भाग थंड पाण्याचा होता. या स्नानगृहाच्या छतासाठी आणि जमिनीसाठी लाल दगड वापरले गेले. जे राजस्थानमधील बायना येथून आणले गेले. उष्णतेवर उपाय शोधून बाबरने राजवाड्याच्या एका भागात बागिचे आणि तलाव बांधण्यात आले होते.

किल्ल्यात बांधली विहीर

किल्ल्याच्या आत, वास्तू आणि तटबंदीच्या मध्ये एक मोकळी जागा होती; तेथे एक मोठी विहीर बांधण्याचा आदेश सम्राट बाबरने दिला होता. याच दरम्यान मान्सूनचेही आगमन झाले होते. पावसामुळे काम करणे अवघड होते. त्यामुळे, विहीरीचे बांधकाम पडले, जमिनीखाली कामगार दबले गेले. त्यावेळी अनेक कामगारांना जीवही गमवावा लागला असल्याचे सांगितले जाते.

राजवाडे,महालांचे बांधकामही केले गेले उन्हाळा लक्षात घेऊन

मुघल सुद्धा विविध प्रकारच्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध होते. भारतातील उष्णता लक्षात घेऊन त्यांच्या काळात थेट सूर्यप्रकाश पोहोचत नाही असे राजवाडे बांधले. वाड्यांपर्यंत हवा पोहोचावी म्हणून दगडी भिंती जाळीसारख्या बनवल्या होत्या. दगडी जाळीच्या खिडक्यांचे अनेक फायदे होते. बाहेरच्या माणसाला आत दिसत नाही आणि हवेचे स्वरूप आत पोहोचल्यावर बदलायचे. ही हवा थंड व्हायची, ज्याचा उन्हाळ्यात अधिक उपयोग व्हायचा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT