A girl stands on a moving Mercedes bonnet performing an ‘Aura Farming’ dance in Mumbai, sparking viral reactions and safety concerns.  esakal
Trending News

Aura Farming Girl Dance Video : फेमस होने के लिए कुछ भी...! चालत्या मर्सिडिजच्या बोनेटवर उभा राहून मुंबईच्या रस्त्यावर तरूणीचा ‘ऑरा फार्मिंग डान्स’

Mercedes Bonnet Stunt in Mumbai : सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायर, युजर्सकडून हटके कमेंट दिल्या जात आहेत.

Mayur Ratnaparkhe

आजकाल सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी कोण काय करेल, याचा अंदाजही कुणी लावू शकणार नाही. दररोज आपण हजारो व्हिडिओ पाहतो, ज्यामध्ये काहीतरी हटके करून सोशल मीडियावर हिरो होण्यासाठी केलेली धडपड आपल्याला दिसते.

कधीकधी हे व्हिडिओ तुफान हसवणारे, कधी रडवणारे, कधी भयानक अंगावर काटा आणणारे, तर कधी आपलं डोकं चकरावून टाकणारे असे कोणत्याही प्रकारचे असतात.  असाच एक व्हिडिओ आता मुंबईतून समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या मुंबईच्या व्हिडिओबाबत जाणून घेण्याआधी तो व्हिडिओ नेमका कोणत्या सोशल मीडियावरील ट्रेंडिंग व्हिडिओवरून बनवला गेला आहे, त्याबाबत जाणून घेऊयात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ आपल्याला सातत्याने दिसत आहे, ज्यात एक साधारण दहा ते अकरा वर्षांचा मुलगा एका धावत्या बोटीच्या समोरी टोकावर उभा राहून, एका विशिष्ट स्टाइलने डान्स करतोय.

सोशल मीडियावर लोक त्याला 'ऑरा फार्मर' म्हणतात आणि लोक त्याच्या डान्सला 'ऑरा फार्मिंग' म्हणतात. तो मुलगा काही दिवसांत खूप प्रसिद्ध झाला. त्याचा व्हिडिओही व्हायरल झाला. आता एका महिलेने त्याच डान्स स्टेपची कॉपी करत व्हिडिओ बनवला जो व्हायरल झाला आहे.

तर आता मुंबईतील जो व्हिडिओ समोर आली आहे, त्यामध्ये एक तरूणी ही मुंबईतील रस्त्यावरून चालणाऱ्या एका काळ्या मर्सिडिजच्या बोनेटेवर उभा राहून, 'ऑरा फार्मिंग' डान्स करताना दिसत आहे. तर यावेळी तिला रस्त्यावरील आजूबाजूचे लोक पाहत असल्याचेही दिसून येते.

आता या व्हिडिओवर अनेक कमेंट येत आहेत. काहींनी मुंबई वाहतूक पोलिसांनाही हा व्हिडिओ टॅग केलाय आणि कारवाईची मागणी केली आहे.. तर केवळ काहीतरी हटके करून आपल्याकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठी असले प्रकार केले जातात, ज्याचे भयानक परिणामही होवू शकतात. असं एका सोशल मीडिया युजर्सने म्हटलं आहे. याशिवाय बऱ्याच जणांनी या तरूणीच्या या हटके कृतीचे कौतुकही केल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर nazmeen.sulde नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे आणि तो एक नवीन ट्रेंड म्हणून वर्णन केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavan Clash: धक्कादायक! मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये राडा, थेट बुटाने मारण्याची धमकी

AI for Kids: पाचवीची मुले घेताहेत 'एआय'चे धडे; जाणून घ्या काय आहे 'या' खास पुस्तकात

Pimpalgaon Baswant : पिंपळगावात तिजोरी रिकामी, विकासकामे ठप्प; नगर परिषदेसमोर 'भीक मांगो' आंदोलन

''बेफाम गुन्हेगारी वाढलेल्या सरकारला मी पाठिंबा देतोय...'' चिराग पासवान यांनी स्पष्ट सांगितलं

Mumbai - Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवे बनला मृत्यूचा सापळा! ३३५ जणांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

SCROLL FOR NEXT