Viral Video Sakal
Trending News

Viral Video : पुरात अडकलेल्या कार काढण्यासाठी मुंबईकरांची कसरत; घरात घुसले पाणी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईसह राज्यात पावसाने थैमान घातलं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि वस्त्यामध्ये पाणी घुसलं आहे. तर नागरिकांचे नुकसान झाले असून पुराच्या पाण्यामध्ये अनेक वाहने वाहून गेल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. पुराच्या पाण्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबीवली, नवी मुंबई या भागामध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.

सध्या मीरा भाईंदर येथील एक व्हिडिओ व्हायरल होत असून कारला बाहेर काढण्यासाठी पाच ते सहाजण प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. तर दुसरी कार पाण्यामध्ये अर्धी बुडाल्याचं चित्र आहे. ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील एका लेनवर पूर्णपणे पुराचे पाणी आल्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आला होता.

मुसळधार पावसामुळे नागरिकांचे हाल

मुंबई आणि उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे अनेक इमारतींच्या पार्किंकमध्ये पाणी घुसलं असून वस्त्यामध्ये पाणी घुसल्यामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. पार्किंगमध्ये लावलेल्या गाड्यासुद्धा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

राज्यातील अनेक भागांत दमदार पाऊस

विदर्भातील नागपूर, वर्धा, बुलढाणा, अकोला, पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर अनेक नद्यांना पूर आल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. वर्धा, यवतमाळ, अकोला बुलढाण्यामधील शेतकऱ्यांचे पिके पाण्याखाली गेले आहेत तर मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस नसल्यामुळे पेरण्याही न झाल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारत-पाकिस्तानमध्ये तणाव पुन्हा वाढला; शहबाज शरीफांचा भारताला थेट इशारा, उमर अब्दुल्लांनीही पाकला सुनावलं

Independence Day Wishes in Marathi: "झंडा ऊँचा रहे हमारा..." स्वातंत्र्यदिनानिमित्त तुमच्या प्रियजनांना द्या खास मराठी शुभेच्छा आणि देशभक्तीपर संदेश!

Red Fort Flag Hoisting: भारताच्या 'या' दोन पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकावला नव्हता; काय आहे इतिहास?

IPL: हार्दिक पंड्याला KKRची खुली ऑफर? माजी खेळाडू म्हणाला, ‘या’ संघात मिळेल नेतृत्वाची जबाबदारी; IPL 2027 आधी मोठ्या ट्रेडची चर्चा

Marathi News Live Updates : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी घोषणा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू स्थापन करणार नवा राजकीय पक्ष

SCROLL FOR NEXT