Video Viral Sakal
Trending News

Video Viral : "लोकल मध्ये काटा लगा !" मुंबईची झाली तुंबई पण मुंबईकरांच स्पिरीट कमी होईना

मुंबईचे रस्ते पावसाने तुडूंब भरले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

लांबलेल्या मान्सूनने दमदारपणे एंट्री केली असून मुंबईतील रस्ते तुडूंब भरले आहेत. मुंबईची तुंबई झाली तरी मुंबईकरांचं स्पिरीट कमी होत नाही हे आपल्याला सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून दिसून येईल. मुंबईकरांना दरवर्षी या समस्येला तोंड द्यावे लागते पण ते कधी या समस्येला वैतागत नाहीत हीच मुंबईकर मराठी माणसांचं वैशिष्ट आहे.

सध्या लोकल ट्रेनमधील काही मराठी माणसांचा व्हिडिओ व्हायरल झाला असून हे मुंबईकर लोकलमध्ये "काटा लगा" या प्रसिद्ध गाण्यावर ठेका धरताना दिसत आहेत. काहीजण गायन करत आहेत तर काहीजण डान्स करत आहेत. यातील बरेचजण वृद्ध व्यक्ती असून त्यांच स्पिरीट पाहून तुम्हीही थक्क व्हाल. आमची मुंबई या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबईची तुंबई झाली असून बहुतांश रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तर पुराच्या पाण्यातून वाट काढून नागरिक आपलं घर गाठत आहे. या पावसातही मुंबईकरांचं हे स्पिरीट पाहून अनेकांनी यांचं कौतुक केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून त्यावर अनेकांनी आपल्या कमेंट केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT