Viral Video Sakal
Trending News

Viral Video : कंबरेएवढं पाणी अन् ट्राफिक जाम; मुंबईकरांचे हाल होईनात कमी

कंबरेएवढ्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागत आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : मागच्या काही दिवसांपासून मुंबईसह मुंबई उपनगरामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत. तर नागरिकांना यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे.

मुंबईतील वसई विरार भागातील वसई पूर्व येथील एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये रस्त्यावर काही ठिकाणी गुडघ्याएवढे तर काही ठिकाणी कंबरेएवढे पाणी साचल्याचं चित्र आहे. तर याच पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागली आहे. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली असून काही वाहने बंद पडली आहेत. त्यांना धक्का देत बाहेर काढण्यात येत आहे.

नागरिकांचे जनजीवन विस्कळीत

मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले असून संसार उघड्यावर आले आहेत. तर दुचाकी आणि चारचाकी वाहने वाहून गेल्याच्याही घटना घडल्या आहेत. रस्त्यावर पाणी आल्यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

नागपूर, वर्धा, बुलढाणा, अकोला, कोल्हापूर आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. वर्धा, यवतमाळ, अकोला बुलढाण्यामधील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेले आहेत तर मराठवाड्यातील अनेक भागांत पाऊस नसल्याची स्थिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT