Viral Video Sakal
Trending News

"RSS समर्थक महिलेची मुस्लिमांकडून भररस्त्यात गोळ्या घालून हत्या" Viral Video मागचं नेमकं सत्य काय?

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

केरळमध्ये एका आरएसएस समर्थक असलेल्या महिलेची भर रस्त्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली असं कॅप्शन टाकून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामध्ये चारचाकी गाडीमध्ये चाललेल्या महिलेला बाहेर खेचून तिची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या केल्याचं दिसत आहे.

पण व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका हत्येचा नसून तो एका पथनाट्यातील सीनचा आहे. हे पथनाट्य २०१७ साली केरळच्या रस्त्यावर सादर करण्यात आले होते. गौरी लंकेश यांच्या हत्येच्या निषेधार्थ हे नाटक केरळमधील DYFI युनिटने सादर केले होते. तर काही उजव्या विचारसरणी असलेल्या लोकांनी या व्हिडिओला चुकीच्या पद्धतीने शेअर केलं आहे.

दरम्यान, केरळमध्ये आरएसएस आणि त्यांच्या समर्थकांच्या हत्या झाल्याच्या घटना वारंवार होत असतात. त्यामुळे मुस्लीम हिंदू वाद काही प्रमाणात केरळमध्ये पाहायला मिळतो. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुस्लीम व्यक्तीने आरएसएस समर्थकाची हत्या केली नसल्याचं सत्य बाहेर आलं आहे.

या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या कमेंट केल्या आहेत. या व्हिडिओमुळे समाजात वाद पसरण्याची शक्यता आहे. पण समाजाने सत्य समजून घ्यायला पाहिजे. अशा चुकीच्या व्हिडिओवर आणि अफवांवर विश्वास ठेवला नाही पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT