Navneet Rana Video Sakal
Trending News

Navneet Rana Video : खासदार राणा बनल्या TDM; ट्रॅक्टरवर बसून केली शेतीची मशागत

सकाळ डिजिटल टीम

अमरावती : खासदार नवनीत राणा या कायम कोणत्या ना कोणत्या स्टंटसाठी प्रसिद्ध असतात. ग्रामीण भागात जाऊन गाडी चालवणे असो किंवा आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांच्या सण उत्सवामध्ये डान्स करणे असो किंवा वाद्य वाजवणे असो त्या कायम चर्चेत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये त्या एका शेतकऱ्याच्या शेतात जाऊन ट्रॅक्टर चालवताना दिसत आहेत. त्याचबरोबर शेतातील पेरणीपूर्ण मशागतीचा त्यांनी आढावा घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील प्रमोद फरतोडे या शेतकऱ्याशी त्यांनी संवाद साधला.

त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी निसर्गदेवतेकडे मागणी केली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

शेतात त्यांनी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर चालवला असून महिंद्रा ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला ग्रामीण भागातं TDM म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे खासदार नवनीत राणा आज TDM बनल्या असं म्हणायला हरकत नाही. त्या आपल्या मतदारसंघात कायम फिरत असतात. जनतेच्या वेगवेगळ्या समस्या जाणून घेत असतात. तर यामुळे त्या सोशल मीडियावर चर्चेतही असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT