marriage esakal
Trending News

Crime : लग्नानंतर संसाराचं स्वप्न रंगवलं पण 7 दिवसांत सोनंनाणं घेऊन नवरी जुन्या बॉयफ्रेंडसोबत फरार

सकाळ डिजिटल टीम

Crime News : थाटामाटात लग्न लावलं, बायकोला मोठ्या तोऱ्यात घरी आणलं, लग्नानंतरचे सगळे विधी आवरले, त्यानंतर बायको घरच्यांना भेटायला म्हणून गेली ती कायमचीच, परत आलीच नाही. अशा घटना अलीकडे महाराष्ट्रात घडायला लागल्या आहेत. लग्नाला मुली मिळत नसल्यामुळे फसवणुकीचे अनेक प्रकार घडत आहेत. पण हा प्रकार घडला आहे उत्तरप्रदेशमध्ये.

उत्तरप्रदेशमधील बांदा येथे ३१ मे रोजी एका मुलाचे लग्न पार पडले. त्याने लग्न लागल्यानंतर मोठ्या थाटामाटात नवरीला घरी आणले. दुसऱ्या दिवशी सगळ्या विधी पार पडल्या. लग्नानंतर सहा दिवसांनी सदर नवरी आईवडिलांना भेटण्यासाठी माहेरी गेली.

त्यानंतर ही नवविवाहिता सामान खरेदी करण्याच्या निमित्ताने बाजारात गेली खरी पण तिने तिथूनच आपल्या जुन्या प्रियकरासोबत पलायन केले. तिच्यासोबत लग्नामध्ये तिला घेतलेले दागिने आणि घरातून नेलेले पैसेसुद्धा होते.

बराच वेळ आपली मुलगी घरी न आल्यामुळे घरच्यांनी तिला संपर्क साधला पण तिचा फोन बंद होता. नंतर कळाले की, नवविवाहिता तिच्या भावाच्या सासरच्या एका नातेवाईकासोबत पळून गेली आहे. या प्रकारानंतर तिच्या वडिलांनी दोन संशयित तरूणांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांकडून याप्रकरणी अधिकचा तपास सुरू केला आहे.

पण विवाहित तरूणाची फसवणूक झाली असून त्याचे लग्नानंतर रंगवलेले स्वप्न संसार सुरू होण्याआधीच संपलं आहे. त्याचबरोबर या तरूणाची आर्थिक फसवणूक झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT