MSEB Video VIral Sakal
Trending News

Video : वीज बिल भरलं नाही, मीटर कट करायले आले कर्मचारी; महिलेने ऑन कॅमेरा सांगितला नियम अन्...

वीज बील नाही भरलं तर काय होतं? नियम जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ पाहा

सकाळ डिजिटल टीम

विरार : अनेकदा आपल्याला लाईट बील भरण्यासाठी उशीर होतो किंवा महावितरणच्या काहीतरी गडबडीमुळे लाईट बील जास्त आल्याच्या घटनेमुळे नागरिकांना नाहक त्रास होत असतो. पण लाईट बील भरलं नाही की लगेच कर्मचारी घरी येतात आणि आपलं वीज कनेक्शन कट करून जातात असं आपल्यापैकी कित्येकांनी अनुभवलं असेल.

असं जर आपल्यासोबत घडलं तर आपण काय करायला पाहिजे? हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे मिळतील. सध्या मुंबईतील विरार येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

त्यामध्ये दोन कर्मचारी लाईट कनेक्शन कट करण्यासाठी आल्याचं पाहायला मिळत आहे. महिलेचा काहीतरी वैयक्तिक अडचण असल्यामुळे तिने लाईट बील भरलं नसल्याचं ती या कर्मचाऱ्यांना सांगते.

"जर सहा महिने लाईट बील भरलं नाही तर कोर्टाकडून ग्राहकाला नोटीस येते आणि नोटीस दिल्यानंतर १५ दिवसांची मुदत लाईट बील भरण्यासाठी दिली जाते. या १५ दिवसांच्या मुदतीतही लाईट बील भरलं नाही तर वीज कनेक्शन महावितरण कडून कट केले जाते. पण त्याअगोदर वीज कनेक्शन कट करणे बेकायदेशीर आहे." असं ती महिला या कर्मचाऱ्यांना सांगते.

त्यावर ते म्हणतात की, "आम्ही तुम्हाला फक्त सांगायला आलो आहोत. आम्ही वीज कनेक्शन कट करण्यासाठी आलो नाही." असं सांगून हे दोन कर्मचारी तिथून निघून जातात. आपल्यासोबतही असं घडल्यावर आपल्याला कनेक्शन कट करण्यासंदर्भातील नियम माहिती असायला हवा. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT