Video Sakal
Trending News

ऑफिसमध्ये गेम खेळताय? बॉसचा तिसरा डोळा उघडा असतो बरं का...; Video होतोय Viral

अनेकांना ऑफिसमध्ये काम सोडून दुसरं काम करण्यात जास्त रस असतो.

सकाळ डिजिटल टीम

ऑफिसमध्ये अनेकांना ऑफिसचं काम सोडून दुसरं काम करण्यात किंवा गेम खेळण्यात जास्त आनंद मिळतो. थोडा जरी मोकळा वेळ मिळाला की, सोशल मीडिया चाळणे किंवा एखाद्याला गेम खेळण्याची आवड असेल तर गेम खेळणे असे काम सुरू असते. पण कर्मचाऱ्याच्या या छुप्या कामाकडे बॉसचं चांगलंच लक्ष असतं.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक कर्मचारी ऑफिसमध्ये गेम खेळताना दिसत आहे. तेवढ्यात समोरून बॉस येतात आणि हा कर्मचारी लॅपटॉपवर सुरू असलेला गेमचा टॅब बदलून काम सुरू करतो.

बॉस आल्यानंतर कर्मचारी कामात खूप तल्लीन असल्यासारखं दाखवतो. बॉस जायला लागतो तेव्हा लगेच कर्मचारी टॅब बदलून पुन्हा गेम सुरू करतो. बॉस परत आला की परत टॅब बदलून काम सुरू करतो.

दरम्यान, कर्मचारी बॉसला फसवतो पण काही क्षणात बॉसच्या हे लक्षात येतं आणि ते कर्मचाऱ्याला खुणावत पाठीमागे इशारा करतात. कर्मचारी पाठीमागे बघतो तेव्हा त्याला पाठीमागच्या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरा असल्याचं निदर्शनास येतं. हे पाहून कर्मचाऱ्यालाही धक्का बसतो. त्यामुळे आपल्या प्रत्येक हालचालींवर बॉसचं चांगलंच लक्ष असतं हे प्रत्येक कर्मचाऱ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे.

हा व्हिडिओ लिंक्डइनवर शेअर करण्यात आला असून ही घटना आपल्यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना लागू पडत असेल. नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तर या व्हिडिओला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT