Old Village Man Holding L&T, UltraTech Shares Worth Rs 102 Crore  Sakal
Trending News

Video Viral: 102 कोटी रुपयांचे शेअर्स असलेला 'बिगबुल', आजोबांच्या व्हिडिओने घातला धुमाकूळ

Video Viral: आजोबांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राहुल शेळके

Video Viral: इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक वृद्ध व्यक्ती दावा करत आहे की त्यांच्याकडे 102 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. श्रीमंत असूनही या वृद्धाच्या साध्या वागण्याने आणि साध्या राहणीमानामुळे नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

ट्विटरवर व्हिडिओ शेअर करणारे राजीव मेहता म्हणाले, त्यांच्याकडे 80 कोटी रुपयांचे एल अँड टी शेअर्स, 21 कोटी रुपयांचे अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स, 1 कोटी रुपयांचे कर्नाटक बँकेचे शेअर्स आहेत. तरीही साधे जीवन जगत आहे. ट्विटरवर हा व्हिडिओ आतापर्यंत सुमारे 4 लाख वेळा पाहिला गेला आहे, ज्यावर अनेक कमेंट येत आहेत.

या पोस्टवर कमेंट करताना, कॅपिटल माइंडचे संस्थापक आणि सीईओ दीपक शेनॉय म्हणाले की, L&T शेअर्सची एकूण किंमत सुमारे 8 कोटी रुपये आहे, तर अल्ट्राटेक शेअर्सची किंमत सुमारे 3.2 कोटी रुपये असेल आणि कर्नाटक बँकेच्या शेअर्सची किंमत सुमारे 8 कोटी रुपये असेल. शेनॉय यांनी लिहिले, ही अजूनही चांगली रक्कम आहे.

आणखी एका व्यक्तीने कमेंट केली की, ते 3.5 कोटी रुपयांच्या शेअर्समधून 6 लाख रुपयांचा चांगला लाभांश मिळवू शकतात. मात्र, दुसऱ्या युजरने असा युक्तिवाद केला की, जर पैसे योग्य प्रकारे वापरले नाहीत तर ते व्यर्थ जातील.

मग त्याचा अर्थ काय? पैसा हा इंधनासारखा असतो, जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल आणि त्याचा काही उपयोग नसेल तर त्याचा अर्थ काय? साधेपणा ही एक गोष्ट आहे पण स्वतःवर काहीही खर्च न करणे ही दुसरी गोष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

Maharashtra Politics : शरद पवारांचं वय झालंय, ते आता थकलेत, 'राष्ट्रवादी'ने कोणत्यातरी पक्षासोबत जावे; मंत्री चंद्रकांतदादांचा थेट सल्ला

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Who was Sandu Karhale? : मराठवाडा मुक्ती संग्रामातील धगधगता तारा हरपला! ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक सांडू कऱ्हाळे यांचे वयाच्या 100 व्या वर्षी निधन, निल्लोडवर शोककळा

Gold Silver Price : सोने-चांदी झाले स्वस्त; एका दिवसात सोने ५ हजारने तर चांदी ४ हजार ९०० रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT