Viral Video  Sakal
Trending News

Viral : एकाच ठिकाणी अनेकदा कोसळली वीज, झाडाला लागली आग; थरारक Video

सकाळ डिजिटल टीम

सध्या मान्सूनच्या पावसाला राज्यात सुरूवात झाली असून लांबलेल्या पावसाने अखेर हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस बरसत आहे. काही भागांत विजांच्या कडाकडाटासह पाऊस पडत असून झाडे उन्मळून पडत आहेत. त्यामुळे मोठे नुकसानही झाले आहे.

सोशल मीडियावर सध्या वीज कडाडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एकाच ठिकाणी सहा ते सात वेळा वीज पडत असून हा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. वीज पडल्यानंतर खाली असलेल्या झाडाला आग लागल्याचं दिसत आहे. घटनास्थळापासून दूर असलेल्या इमारतीवरून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

दरम्यान, हा व्हिडिओ अनेकांनी शेअर केला असून त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. सहसा करून एखाद्या झाडावर वीज कोसळत असते. त्यामुळे पाऊस सुरू असताना झाडांचा आसरा घेऊ नये असा इशारा अनेकदा दिला जातो. वीज कोसळून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या बातम्याही पावसाळ्यात ऐकायला येतात त्यामुळे पाऊस सुरू असताना काळजी घेतली पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FDA Crime : तुकाराम मुंढेंचा सर्वात मोठा दणका! संभाजीनगर शॉक; प्रसिद्ध 'आईच्या गावात' अन् 'यल्ला यल्ला' हॉटेलला टाळे

Women T20 World Cup : भारतीय संघात बदलाचे वारे; वर्ल्ड कप अपयशानंतर वेगवान हालचाली!

Latest Marathi News Live Update : रत्नागिरी-पावसाचा आजपासून तीन दिवस आँरेज अलर्ट

Petrol-Diesel Price: Nayara नंतर सरकारी कंपन्यांचे आजचे दर जाहीर! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल आता किती रुपयांना?

Lohagad Fort : लोहगड किल्ल्याची बदनामी थांबवावी; स्थानिक नागरिकांसह शिवप्रेमींची मागणी

SCROLL FOR NEXT