Railway in Pakistan Sakal
Trending News

Pakistan : पाकिस्तानची परिस्थिती! रेल्वे आली तरी रस्त्यावरील वाहने थांबेनात; ड्रायव्हर हॉर्न वाजवून बेजार

अखेर रेल्वे कर्मचाऱ्यांना फाटक नसलेल्या रस्त्यावर उतरून वाहनांना थांबवावं लागलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

इस्लामाबाद : मागच्या काही महिन्यांपासून पाकिस्तानाची परिस्थिती बिकट आहे. आर्थिक मंदी आणि महागाईमुळे तेथील नागरिक त्रस्त झाले असून काही नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण झाले आहे.

त्याचबरोबर इतर विकसनशील देशांच्या तुलनेत पाकिस्तानची परिस्थिती खूपच बिकट आहे. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यामध्ये रस्त्यावरील वाहतूक पाहून चक्क ट्रेन थांबल्याचं यामध्ये दिसत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडिओ पाकिस्तानातील एका रस्त्यावरील आहे. सदर रस्त्यावर रेल्वेच्या ट्रॅकची क्रॉसिंगसुद्धा आहे. पण ट्रेन आल्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यासाठी कोणतेही फाटक टाकलेले नाही. तर वाहने थांबण्यासाठी ट्रेनचे ड्रायव्हर हॉर्न वाजवून वाजवून वैतागले असून रेल्वे कर्मचारी चक्क रस्त्यावर येऊन वाहतूक थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, वाहतूक कर्मचारी रस्त्यावर आल्यानंतर सुद्धा वाहने रस्त्यावरून जात असल्याचं दिसत आहे. बऱ्याच वेळाने वाहतूक थांबवण्यात आल्यानंतर ट्रेन आपल्या ट्रॅकवरून पुढे निघून जाते. पण वाहनांमुळे चक्क ट्रेन थांबल्याचा प्रकार आपणही पहिल्यांदाच पाहत असाल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी यावर आपल्या विनोदी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dattatray Bharne on Sugar Prices : साखरेच्या दरवाढीचा शेतकऱ्यांना फायदा; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचे मत

Koyna Dam Water Level: कोयना धरण आज 100 टीएमसीचा टप्पा गाठण्याची शक्यता;धरणात किती आहे पाणीसाठा वाचा

Pune Real Estate : पुण्यात घरांच्या विक्रीत तब्बल २१ टक्के घट; देशातील प्रमुख शहरांत काय आहे स्थिती? धक्कादायक अहवाल समोर

Marathi News Live Updates : भोंगवली सबस्टेशनविरोधात कापूरहोळमध्ये आज रास्ता रोको

Mumbai Police: मुंबईतील १५ ठाण्यांची सीमा नव्याने ठरणार, पोलिसांचा हद्दीचा वाद मिटणार; कोणत्या ठाण्यांचा समावेश?

SCROLL FOR NEXT