Pakistani Girl Sakal
Trending News

Pakistani Girl : पाकिस्तानची लाकडं गोळा करणारी छोटी परी, Video पाहून म्हणाल...

या लहानग्या परीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत.

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानमध्ये सध्या अन्न संकटाने धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानमधील लोक एका वेळच्या जेवनासाठी महाग झाले आहेत. अन्नपदार्थाच्या आणि धान्याच्या किंमती गगनाला भिडल्या असून लोकांच्या पिठासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यातच सध्या एका लहान मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा - शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी लाकडं गोळा करताना दिसत आहे. तर तिच्या पाठीवर लाकडं गोळा करण्यासाटी डालगं लटकवलेलं दिसत आहे. ही गोड मुलगी कॅमेऱ्याच चोरून पाहत आहे. पण हीची सुंदरता पाहून आपणही म्हणाल, किती गोड... या मुलीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे.

पाकिस्तानी फोटोग्राफर इम्तियाज हुसैन यांनी हा व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ पाकिस्तानातील असल्याचं बोललं जातंय. झैनाब येथील स्कार्दू व्हॅलीमधील हा व्हिडिओ असल्याचं या पोस्टच्या कॅप्शनमध्ये सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, पाकिस्तानमधील सध्याची भीषण परिस्थीती पाहता अनेक देशांनी पाकिस्तानसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. तर केंद्र सरकाकडून लष्कराच्या उपस्थितीत नागरिकांना पीठ आणि गव्हाचे वाटप केले जात आहे. पिठासाठी नागिरकांचे भांडणे होते असून अनेकजण भुकेमुळे मृत्युमुखी पडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Immigrants India : नक्षलवादानंतर आता घुसखोरांवर सर्जिकल स्ट्राईकची तयारी, अमित शहा यांनी बोलावली मोठी बैठक

Civic Works Halted: मतदार यादी पडताळणीमुळे पथ व भवन विभागाची कामे ठप्प; अभियंत्यांना मोहिमेतून मुक्त करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Sourav Sonawane news: 'सोनवणेंना अटक करा', घुले कुटुंबीय थेट पाण्याच्या टाकीवर चढले

Shrikant Shinde चा ताफा अडवला, काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांकडून जोरदार घोषणाबाजी

Kolhapur Crime: मुलगा की मुलगी? कोल्हापुरात गर्भलिंग निदानचा पर्दाफाश, चौघे ताब्यात; ३० हजार दर

SCROLL FOR NEXT