Viral Tweet esakal
Trending News

Viral Tweet: फ्लाइटच्या जेवणात आढळलं झुरळ! तरी कंपनी म्हणते, आमच्या अन्नाची गुणवत्ता सर्वोच्च...

अवघ्या १० मिनीटांत एअर विस्ताराने प्रवाश्याच्या ट्विटवर उत्तरही दिले आहे

सकाळ डिजिटल टीम

Food News: फ्लाइटमध्ये साधारत: उच्च मध्यमवर्गीय वर्ग प्रवास करत असल्याने सुशिक्षित आणि हेल्थ काँशियस प्रवासी जास्त असतात. मात्र नीट आणि क्लिन फ्लाइटमध्ये तुम्हाला जेवणात झुरळ आढळला तर किती संताप होईल. असाच काहीसा प्रकार एअर विस्ताराच्या फ्लाइटमधून (vistara flight) प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडलाय. संतापून लगेच निकुल सोलंकी यांनी खाद्यपदार्थाचा फोटो ट्विट केला. अवघ्या १० मिनीटांत एअर विस्ताराने प्रवाश्याच्या ट्विटवर उत्तरही दिले आहे.

जेवणात आढळले चक्क मेलेले झुरळ

निकुलने ट्विट केलेल्या फोटोमध्ये इडली सांबर आणि उपमा आहे आणि दुसऱ्या फोटोमध्ये मेलेले झुरळ आहे. चमचमित दिसणाऱ्या जेवणात झुरळ बघून नकुल संतापले. एअर विस्ताराच्या जेवणात एक लहान झुरळ आहे, असेही नकुल यांनी आपल्या ट्विटमध्ये (twitter) म्हटलं आहे.

काय आहे एअरलाइनचे उत्तर?

एअर विस्ताराच्या अधिकृत हँडलवरून नकुल यांना उत्तर देण्यात आले. "नमस्कार निकुल, आमचे संपूर्ण अन्न गुणवत्तेच्या सर्वोच्च मानकांनुसार तयार केले जाते. कृपया तुमचे फ्लाइट तपशील आम्हाला द्या. आम्ही या प्रकरणात लक्ष घालू आणि त्यानंतर शक्य तितक्या लवकर तुम्हाला प्रतिसाद देऊ," असे उत्तर एअर विस्ताराने दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पार्किंगपासून ते दुकानाच्या भाड्यापर्यंत...; विमानतळावर सर्व महाग होणार, टीडीएसएटीच्या मोठ्या निर्णयानं टेन्शन वाढवलं

Viral Video : प्रियकरासोबत वारंवार फरार व्हायची पत्नी; घटस्फोट होताच पतीने दुधाने आंघोळ करत जल्लोष साजरा केला अन्...

Latest Marathi News Updates: कर्जतमध्ये हालीवली येथे पैशाचा पाऊससाठी अघोरी विद्या

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

SCROLL FOR NEXT