Video Sakal
Trending News

Video Viral : पुण्यातील रस्त्यावर थुंकणाऱ्याला महापालिकेने घ्यायला लावलं पुसून

सकाळ डिजिटल टीम

पुणे : पुण्यात होणाऱ्या G20 परिषदेसाठी महापालिकेने जय्यत तयारी सुरू केली असून रस्ते, फुटपाथ, खांबांची रंगरंगोटी केली जात आहे. तर दुभाजकांवर फुलांच्या झाडाची लागवड केली गेली आहे. तसेच मोक्याच्या ठिकाणी महागड्या वस्तू वापरून आकर्षक सजावट केली जात आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

दरम्यान, एवढ्या सजावटीत एखादा रस्त्यावर थुंकला तर त्याला स्वत:लाच ते पुसून घ्यावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने आता रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर कडक कारवाईला सुरूवात केली असून रस्त्यावरील घाण थुंकणाऱ्यांकडून साफ करून घेतली जात आहे. महापालिकेने यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे.

दरम्यान, महापालिकेने ट्वीटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती रस्त्यावर थुंकलेली घाण साफ करताना दिसत आहे. तर हा व्हिडिओ महापालिकेच्या अधिकृत ट्वीटरवरून हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

"परिषद व स्वच्छ सर्वेक्षण २०२३ निमित्त मुख्य रस्ते, फूटपाथ व दुभाजकांवर थुंकणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत पुणे विद्यापीठ मार्गावर एका नगरिकावर कारवाई करून त्यांनी केलेली घाण त्यांच्याद्वारे स्वच्छ करण्यात आली." असं कॅप्शन या व्हिडिओवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

SCROLL FOR NEXT