PM Modi Lakshadweep Visit: 
Trending News

Photos: मोदींचा एक उनाड दिवस! समुद्रात डुबकी, स्नॉक्लिंग अन् बीचवर फेरफटका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली.

Amit Ujagare (अमित उजागरे)

Modi Lakshadweep Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासित प्रदेश असलेल्या लक्षद्वीपला नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी एक दिवस निवांत बीचवर घालवला. यामध्ये त्यांनी वॉटर स्पोर्ट्स तसेच स्नॉर्कलिंगचा आनंदही लुटला. लक्षद्वीप या बेटावरील सौंदर्याचं यावेळी मोदींनी कौतुक केलं आहे.

PM Modi Lakshadweep Visit:

मोदींनी लक्षद्वीप बेटांवर राहणाऱ्या लोकांच्या आदरातिथ्याचं कौतुक केलं आहे. तसेच इथल्या निसर्गसौंदर्याचा मनःशांतीसाठी कसा फायदा घेता येऊ शकतो हे देखील सांगितलं. निसर्गसौंदर्यासोबतच लक्षद्वीपची शांतताही मनमोहक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

PM Modi Lakshadweep Visit:

लक्षद्वीपच्या दौऱ्यादरम्यान मला आगत्ती, बंगाराम आणि कावरत्ती येथील लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. बेटांतील लोकांच्या आदरातिथ्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असंही मोदींनी म्हटलं आहे.

PM Modi Lakshadweep Visit:

त्याचबरोबर इथं साहसी खेळांचा अनुभव ज्यांना घ्यायचा आहे त्यांना सल्ला देताना मोदी म्हणाले, ज्यांना आपल्यातील साहसीपणाचा अनुभव घ्यायचा आहे त्यांच्यासाठी लक्षद्वीप आपल्या यादीत असणं आवश्यक आहे. माझ्या मुक्कामादरम्यान, मी स्नॉर्केलिंगचा देखील प्रयत्न केला, किती आनंददायक अनुभव होता!, अशा शब्दांत मोदींनी आपल्या लक्षद्वीप दौऱ्याचा अनुभवही शेअर केला आहे.

PM Modi Lakshadweep Visit:

140 कोटी भारतीयांच्या कल्याणासाठी आणखी कठोर परिश्रम कसे करायचे? याचं चिंतन करण्याची संधी मला मिळाली, असं मोदींनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्यावर छगन भुजबळ का बोलत नाहीत? स्वत:च भुजबळांनी सांगितलं कारण

Marathi News Live Updates : माझ्या चारित्र्यहननाचा प्रयत्न- आदित्य ठाकरे

Satana News : बागलाणमध्ये सरसकट पीक पंचनाम्यांची मागणी; राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा तहसीलदारांना घेराव

Farmer Rasta Roko : विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; वाहतूक विस्कळीत

Palghar News : पालघर रुग्णालय राडा प्रकरणात शिवसेना पदाधिकारींच्या अडचणी वाढणार?

SCROLL FOR NEXT