Crime Sakal
Trending News

शेअर मार्केटमध्ये स्कॅम! नैराश्यातून महिलेने सोडले घर; पोलिसांच्या टीमने 15 तासांच्या आत शोधले | Cyber Crime

सायबर जागरूकता मोहीमेचा भाग म्हणून पोलिसांनी ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेची ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली या महिलेची तब्बल तीन लाखांपेक्षा जास्त पैशांची फसवणूक झाल्यानंतर नैराश्यातून या महिलेने आपले घर सोडले असल्याची माहिती समोर आली आहे.

अधिक माहितीनुसार, पिंपरी चिंचवडमधील एका महिलेची ऑनलाईन पद्धतीने शेअर मार्केट स्कॅममध्ये जवळपास ३. १५ लाखांची फसवणूक झाली. त्यानंतर या महिलेने नैराश्यातून ३१ जुलै रोजी आपलं घर सोडलं आणि गुजरातेतील सुरतला निघून गेली.

हरवल्याची तक्रार दाखल केल्यानंतर या महिलेला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या पथकाने फक्त १५ तासांच्या आत शोधून काढलं आहे. शोधल्यानंतर पोलिसांनी या महिलेला तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केले आहे. सायबर जागरूकता मोहीमेचा भाग म्हणून त्यांनी ही माहिती आपल्या ट्वीटरवरून शेअर केली आहे.

"सायबर जागरूकता मोहीमेचा भाग म्हणून या आठवड्यातील एक घटना आपल्या सोबत शेअर करत आहोत ऑनलाइन शेअर मार्केट स्कॅममध्ये एका महिलेचे ₹३.१५ लाखांचे नुकसान झाले. तणावामुळे ती ३१ जुलै रोजी घर सोडून गेली आमच्या टीमने तिला १५ तासांच्या आत सुरतमधून शोधून काढले आणि कुटुंबास सुपूर्द केले..!" असं ट्वीट पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur: कोल्हापुरात MH 09 वगळता इतर वाहनांसाठी 'प्रवेश कर', महापालिकेचा निर्णय तुघलकी; विरोधकांचा संताप

Womens T20 WorldCup: २४ चेंडूत वादळ, दक्षिण आफ्रिकेचा केला धुव्वा! महिला विश्वचषकात ऑस्ट्रेलियाची दणदणीत सुरुवात

मराठी चित्रपटसृष्टीला मिळाला आश्वासक नायक; 'दादा, एक गुड न्यूज आहे' फेम ऋषी मनोहरचा नवा धमाका! १९ जूनला काय होणार खास?

दोर बांधायला विसरले, बंजी जंपिंगवेळी निष्काळजीपणा; २१ वर्षीय तरुणीला तशीच फेकली, जागीच मृत्यू

Mumbai News: मुंबईतील स्मशानभूमी होणार प्रदूषणमुक्त, 'कार्बनमुक्त स्मशानभूमी वायुप्रदूषण नियंत्रण प्रणाली' बसवणार

SCROLL FOR NEXT