Modi In America Sakal
Trending News

Modi In America : मुसळधार पावसात राखला राष्ट्रगीताचा मान! पंतप्रधान मोदी भिजले पावसात; Video Viral

हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

दत्ता लवांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मोदी न्यूयॉर्कहून वॉशिंग्टनला पोहोचले. येथे त्यांचे मोठ्या सन्मानाने स्वागत करण्यात आले आहे. पण पंतप्रधान मोदी विमानतळावर उतरताच जोरदार पाऊस सुरू झाला आणि अशा परिस्थितीतही ते राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ पावसात भिजले आहेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

पीएम मोदींच्या सन्मानार्थ वॉशिंग्टन डीसी येथे भव्य स्वागत करण्यात आले. ज्यावेळी मोदी विमानातून उतरले त्यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रगीतही वाजवण्यात आले होते. पण त्यावेळी पाऊस सुरू असल्याने राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ पंतप्रधान मोदी भर पावसात सावधान मुद्रेत उभे राहिले आहेत.

राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भरपावसात भिजले असून त्यांचा व्हिडिओ भाजपने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून शेअर केला आहे. यावेळी मोदी यांचे अमेरिकेतील भारतीयांकडून जोरदार स्वागत करण्यात आले आहे. येथील भारतीय समुदायाची उब आणि इंद्रदेवाच्या कृपेमुळे ही भेट अधिक खास बनली अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अमेरिकेतील ठिकठिकाणी जोरात स्वागत केले जाणार असून त्यांच्या आगमापूर्वी त्यांच्या स्वागतासाठी भारतीय वंशाच्या महिला तयारी करत आहेत. रिचमंड येथे या महिला नृत्याची तयारी सुरू आहे. त्यांच्या नृत्याच्या तालमीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण मोदी यांनी पावसात भिजून राष्ट्रगीताचा मान राखल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मोदी यांची अमेरिकेमध्ये खास सोय करण्यात आली असून त्यांच्यासाठी शाकाहारी भोजनाची सोय करण्यात आली आहे. त्यांच्यासाठी बाजरीची भाकरीसहित खालील मेनू ठेवण्यात आला आहे.

  • लेमन डिल योगर्ट सॉस

  • क्रिस्प्ड मिलेट केक

  • समर स्कावशेश

  • मॅरिनेटेड मिलेट

  • ग्रिल्ड कॉर्न कर्नल सलाड

  • कंप्रेस्ड वॉटरमेलन

  • टँगी एवाकाडो सॉस

  • स्टफ्ड पोर्टोबेल्लो मशरूम

  • क्रीमी सैफरॉन इन्फ्यूस्ड रिसोट्टो

  • रोज अॅन्ड कार्डामोन- इनफ्यूस्ड स्ट्रॉबेरी शॉर्टकेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

VIDEO : रेल्वे पुलासाठी खोदलेल्या खड्ड्यात चार मुलं बुडाली; चौघांची प्रकृती चिंताजनक...यवतमाळमधील घटना, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT