Video Viral Sakal
Trending News

Video Viral : फ्रान्समध्ये भारताचा डंका! 'जय हो' गाणं वाजवत पंतप्रधान मोदींचं स्वागत

दत्ता लवांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांच्याकडून मोदींना मेजवानी देण्यात आली. यावेळी मोदींच्या स्वागसाठी "जय हो" हे गाणं वाजवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

मोदी यांना दिलेल्या मेजवानीमध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळ्या खाद्यपदार्थ्यांची आणि गाण्यांची सोय करण्यात आली होती. या कार्यक्रमात भारतीय स्लमडॉग मिलीनिअर या चित्रपटातील "जय हो" हे गाणं गायकांनी दोनदा गायलं. हे गाणं ऐकून मोदींच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. तर सभागृहातील उपस्थितांकडून टाळ्या वाजवून या कलाकारांना दाद देण्यात आली आहे. १४ जुलै रोजी रात्री हा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीमध्ये अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि त्यांच्या पत्नी ब्रिगिट मॅक्रॉन यांनी मोदींना वेगवेगळ्या भेटवस्तू दिल्या आहेत. मोदींनी तेथील अनेक कार्यक्रमामध्ये भाग घेतला असून, "माझे फ्रान्ससोबतचे नाते अनेक दशके जुने आहे" असं सांगितलं.

देशांतर्गत संबंध दृढ होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं मोदींनी यावेळी सांगितलं. तसेच भारतात ४० वर्षापासून असलेल्या फ्रान्सच्या सांस्कृतिक केंद्राचा सदस्य असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सच्या सांस्कृतिक केंद्राचा सदस्य आज तुमच्यासमोर उभा आहे असं ते सभेत म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Corporator House Firing : नागपूरमध्ये मध्यरात्री थरार! काँग्रेस नगरसेवक शुभम मोटघरे यांच्या घरावर अज्ञात युवकांकडून गोळीबार; घातपाताचा संशय बळावला

Nagpur Godhani Chlorine Gas Leak: गोधनीत पुन्हा क्लोरीन गळतीची भीती; जलशुद्धीकरण केंद्राच्या देखभालीवर नागरिकांचे सवाल

Viral Video: ये रे ये रे पावसा... पंतला दुखापत, तरी पावसात भिजण्याचा मोह आवरेना! फॅनच्या काळजीवर ऋषभचं भन्नाट उत्तर, VIDEO व्हायरल

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Amba Ghat Road Repair : आंबा घाटात आधुनिक एरडॉक्स प्लेटस्‌चा वापर; खचलेल्या भागात 30 मीटर लांब, 5 मीटर उंच भिंत, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT