Narendra Modi Joe Biden Sakal
Trending News

PM Modi in USA: "कसा पकडायचा दारूचा ग्लास?" बायडेन गुरुजींनी घेतला मोदींचा क्लास; आवरेना हसू Video Viral

दत्ता लवांडे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील स्टेट डिनर कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी इंडस्ट्री, फॅशन आणि राजकारण जगतातील अनेक सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला होता. स्थानिक वेळेनुसार गुरुवारी झालेल्या या स्टेट डिनरमध्ये दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध वेगळ्या उंचीवर नेण्याची चर्चा रंगली होती.

पण यावेळी एका किस्स्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी पोट धरून हसले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

स्टेट डिनर कार्यक्रमात एक विनोदी किस्सा घडला. पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये सहसा करून टोस्टसोबत अल्कोहोल प्यायले जाते. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दारूचे सेवन करत नसल्यामुळे ते टोस्टसोबत नॉन-अल्कोहोल जिंजर अले पेय पित होते. मोदींना पाहून बायडेन यांनी उपस्थित असलेल्या सर्वांना एक किस्सा सांगितला.

यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन म्हणाले की, "माझे आजोबा अॅम्ब्रोस फिनेगन म्हणायचे की, जर तुम्हाला तुमच्या ग्लासमध्ये वाइन नको असेल तर तुम्ही ग्लास तुमच्या डाव्या हातात धरला पाहिजे. तुम्हा सर्वांना वाटत असेल की मी मस्करी करतोय पण तसे नाही."

बायडेन यांच्या या सल्ल्यावर कार्यक्रमात उपस्थित लोकांसह पंतप्रधान मोदी मोठ्याने हसले. मोदींना बराच वेळ यावरून हसू आवरेना. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

दरम्यान, अमेरिकन सरकारने दिलेल्या डिनर पार्टीसाठी उद्योग, व्यवसाय, चित्रपट, राजकीय जगतातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये भारताचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी, आनंद महिंद्रा, प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम. नाईट श्यामलन, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, प्रसिद्ध फॅशन डिझायनर राफ लॉरेन, माजी टेनिस दिग्गज बिली जीन किंग, मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांचा सामावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra NCC Crisis: राज्य सरकारच्या लालफीतशाहीमुळे एनसीसी विस्ताराला ब्रेक; दीड लाख छात्रांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण अकादमीचा अभाव, ४०-६० टक्के पदे रिक्त

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावली तातडीची बैठक...

Mulshi Aadhaar: आधार अपडेटअभावी मुळशीतील १,२४६ विद्यार्थी अडचणीत; ३० सप्टेंबरच्या डेडलाइनने प्रशासनाची परीक्षा

Kannad Ambadi Dam Water Crisis: अंबाडी धरणातील पाणीसाठा फक्त ८.९१ टक्के; जानेवारीनंतर कन्नड शहर व परिसरात तीव्र पाणीटंचाईची शक्यता

Leopard Attack Nirgudsar: निरगुडसरमध्ये बिबट्याचा हल्ला; ब्रिडिंगसाठी आणलेला ६० हजारांचा बोकड व मेंढी ठार

SCROLL FOR NEXT