PM Modi South Indian look esakal
Trending News

Narendra Modi : सोशल मीडियावर PM मोदींचीच हवा; South Indian लूक होतोय ट्रेंड

पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतीय लूक असलेला धोती-कुर्ता परिधान केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतीय लूक असलेला धोती-कुर्ता परिधान केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवारी उत्तर प्रदेशातील वाराणसी (Uttar Pradesh Varanasi) इथं 'काशी तमिळ संगम'चं उद्घाटन केलं. यादरम्यान पीएम मोदींचा लूक चर्चेचा विषय ठरलाय.

या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी दक्षिण भारतीय लूक (South Indian look) असलेला धोती-कुर्ता परिधान केला होता. #KashiTamilSangamam या हॅशटॅगसह PM मोदींच्या दक्षिण भारतीय लूकचे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड झाले आहेत. जवळपास 64,000 ट्विटर वापरकर्त्यांनी रिट्विट्स, लाईक्स आणि कमेंट्सद्वारे हॅशटॅगचा वापर केलाय. 25,000 हून अधिक लोकांनी 'काशी तमिळ संगम' कार्यक्रमाबद्दल पोस्ट केल्या आहेत.

एका ट्विटर युजर्सनं लिहिलंय, तामिळनाडू (Tamil Nadu) असो किंवा काशी. आपण सर्व भारतीय नागरिक आहोत. 'काशी तमिळ संगम'साठी शुभेच्छा! दुसर्‍या एकानं लिहिलंय, पीएम मोदींचा पोशाख त्यांच्या आजच्या कार्यक्रमात अगदी सूट झालाय. अनेकांनी याला 'पिक ऑफ द डे' असंही संबोधलंय. दुसऱ्या युजर्सनं लिहिलंय, 'काशी तमिळ संगम इथं पंतप्रधान मोदींनी तमिळ महान कवी सुब्रमण्यम भारती यांचा उल्लेख केला. तामिळ आणि काशीचं प्रेम कायम राहावं यासाठी बीएचयूमध्ये महान कवीच्या नावानं एक आसन स्थापन करण्यात आलं आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेतून ठरणार रोहित-विराटचं भवितव्य? माजी प्रशिक्षकाच्या विधानानं खळबळ...

Arya Chavan: आर्या चव्हाणच्या मारकऱ्याला फाशीच द्या! 'सातारा सकल मराठा क्रांती मोर्चासह ग्रामस्‍थ आक्रमक'; खटला जलदगती न्‍यायालयात चालवा

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांतून मॉन्सून माघारी

Quick Breakfast Idea: प्रोटिनने भरपूर, चवीला मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा खुसखुशीत बटर गार्लिक पनीर

मोठी बातमी! दिवाळीपूर्वी नुकसान भरपाईची ग्वाही, पण ३३ पैकी ५ जिल्ह्यांचेच पंचनामा अहवाल अंतिम; शेतकऱ्यांसाठी ३१,६२८ कोटींचे पॅकेज, पण...

SCROLL FOR NEXT