ingrid larissa  
Trending News

Polyandry Relationship: अजबच! दोन पतींसोबत मजेत जगतेय 'ही' महिला आता तिसऱ्याचीही होणार एन्ट्री

सोशल मीडियावर अशा काही भन्नाट बातम्या व्हायरल होतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर अशा काही भन्नाट बातम्या व्हायरल होतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. सध्या याच सोशल मीडियावर एका अशा महिलेची चर्चा सुरु आहे, जी आपल्या दोन नवऱ्यांसोबत राहत आहे. हो हे अजब वाटत असलं तरी खरं आहे.

२७ वर्षांची ही महिला आपल्या दोन पतींसोबत एकत्र राहते तसेच आणखी एका तरुणाशी ती लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची खबर आहे. त्यामुळं या तिघांच्या संसारात आणि आणखी एका पतीची एन्ट्री होणार आहे. या अशा प्रकारच्या एकाच महिलेच्या अनेक पतींसोबतच्या संसाराला 'पॉलिएंड्री रिलेशनशीप' असं म्हटलं जातं. या रिलेशनशीपमध्ये आपण खूश असल्याचं या महिलेनं म्हटलं आहे.

कोण आहे ही महिला?

लॅरी इंग्रिड नामक २७ वर्षीय महिला ब्राझिलची रहिवाशी असून ती सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर या महिलेला युजर्स लॅरिसा या नावानं ओळखतात. ती इन्टाग्रामवर देखील खूपच अॅक्टिव्ह असते. इन्स्टावर तिचे चांगलेच फॉलोवर्स आहेत. लॅऱीचा पहिला नवरा इटालो सिलवा २५ वर्षांचा असून दुसरा पती जोआओ व्हिक्टर हा १८ वर्षांचा आहे. लॅरी सोशल मीडियावर रोजच्या जीवनातील फोटो आणि व्हिडिओ कायम शेअर करत असते.

द न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, लॅरीनं आपल्या दोन पतींबाबत माहिती देताना सांगितलंय की, आठ वर्षांपूर्वी तीची इटालो सिलवा याची भेट झाली होती. सिलवा यानंतच तिला सुचवलं होतं की, तीन आपल्या जीवनात दुसऱ्या मुलासोबतही विवाह करु शकते. पतीच्या या सल्ल्यानंतर लॅरीनं आपला लहानपणीचा मित्र व्हिक्टरची निवड केली. आता ती या दोन्ही पतींसोबत खूशीत जवीन जगते आहे. सुरुवातीला तिच्या दोन्ही पतींमध्ये बरीच थोडं अडचणीचं वाटत होतं, पण आता हे तिघेही आनंदात जीवन जगत आहेत.

महिलेला मिळतंय मानसिक समाधान

लॅरिसानं म्हटलंय की, दोन पतींसोबत राहताना तिच्या मानसिक आरोग्यात चांगलीच सुधारणा झाली आहे. तिचे दोन्ही पती घऱातलं काम करतात. दोन्ही पती तिच्यावर जीवापाड प्रेम करत असल्याचंही तिनं म्हटलं आहे. त्यामुळं तिला आपलं काम आणि दोन पतींशिवाय दुसऱ्या गोष्टींचा विचार करण्याची फुरसतच मिळत नाही. त्यामुळं डिप्रेशनसारख्या गोष्टींपासून ती दूर आहे. त्यामुळं तिनं आता तीसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे ही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency कर कक्षेत

महिलेच्या पतीनं काय म्हटलंय?

लॅरीच्या दुसऱ्या पतीनं व्हिक्टरनं म्हटलं की, सुरुवातीला या नात्यासाठी त्याला आपल्या कुटुंबियांना राजी करणं खूपच कठीण गेलं. पण नंतर ते यासाठी तयार झाले. दुसऱ्या पतीनं सांगितलं की व्हिक्टर आणि त्याच्यामध्ये चांगले संबंध आहेत. सुरुवातीला त्याला कोणा तिसऱ्या व्यक्तीनं लॅराच्या जवळ येण्याचा प्रयत्न केल्यास त्रास व्हायचा पण आता तिघेही आपसात बातचीत करुन सर्वकाही सुरळीत करतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi Mahapuja : '20 वर्षे एकही वारी चुकवली नाही...'; मुख्यमंत्री फडणवीसांसोबत शासकीय महापूजेचा कोणाला मिळाला मान? धाराशिवमधील शेतकरी दाम्पत्य आहे तरी कोण?

Pandharpur Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न; धाराशिवच्या शेतकरी दाम्पत्याला मिळाला 'मानाचा वारकरी' होण्याचा बहुमान

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : "पांडुरंगा, सर्वांना सुखी ठेव, चांगला पाऊस पडू दे..."; CM फडणवीसांसोबत महापूजा केल्यानंतर मानाच्या वारकऱ्याचे विठुरायाला साकडे

Pandharpur Ashadhi Wari : पंढरपुरात वैष्णवांचा मेळा! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पहाटे पार पडणार शासकीय महापूजा, 20 लाख भाविक दाखल

PM Modi Instagram Video : 'थँक्यू फ्रेंड्स!' नीट पेपरफुटीच्या वादावर पंतप्रधान मोदींचा तरुणांना मध्यरात्री नवा मेसेज; Instagram वर व्हिडिओ पोस्ट करत काय म्हणाले पीएम?

SCROLL FOR NEXT