Viral Video Sakal
Trending News

मला वाचवा, मला वाचवा बस ड्रायव्हर करतोय किडनॅप; PMPLमधल्या तरुणाचा Video viral

सोशल मीडियावर शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बसमधील एक प्रवासी तरुण ‘मला वाचवा, मला वाचवा’ असे ओरडत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे.

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बसमधील एक प्रवासी तरुण ‘मला वाचवा, मला वाचवा’ असे ओरडत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे.

पिंपरी - सोशल मीडियावर शनिवारी सकाळी पिंपरी-चिंचवड शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. बसमधील एक प्रवासी तरुण ‘मला वाचवा, मला वाचवा’ असे ओरडत असल्याचे त्यामध्ये दिसत आहे. ‘ड्रायव्हर मला किडनॅप करत आहे. तो मला बसमधून उतरू देत नाही.’ ‘मला माझ्या ऑफिससमोर सोडा’ अशा प्रकारे तो चालकाच्या केबिनच्या बाजूला उभा राहून जोर-जोरात आरडाओरड करत आहे. हा व्हिडिओ चिंचवड मार्गे धावणाऱ्या पीएमपीएमएल बसमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता.१४) सकाळच्या वेळेत ही बस चिंचवडहून बालेवाडीकडे जात होती. वास्तविक बस बीआरटीतून जाताना अधिकृत थांब्यावर थांबतात. परंतु, या तरुणाने बस मध्येच थांबवून चालकाला दरवाजा उघडण्यास सांगितले. यावर अशी मध्येच बस थांबवणार नाही, ती अधिकृत थांब्यावरच थांबविली जाईल, असे चालकाने सांगितले. यावर प्रवाशाने चालकासमोरील विविध बटन दाबून दरवाजा उघडा, दरवाजा उघडा अशी आरडाओरड सुरू केली. यातून वाद वाढत गेला. अरेरावी केल्यामुळे ड्रायव्हरने दरवाजे लॉक करून ठेवले.

यानंतर तरुणाने आणखी चिडून बसचा डॅशबोर्ड जोरजोरात बडविण्यास सुरवात केली. यावर प्रवाशांनी त्याला शांत रहा, असे सांगण्याचा प्रयत्न करत होते. तरीही ऐकण्याच्या मनःस्थितीत तो नव्हता. त्याच्या आरडाओरड्याने रस्त्यावरून जाणारे इतर दुचाकीचालक, नागरिकांची गर्दी जमा झाली. ‘मला माझ्या ऑफिस जवळ उतरू द्या म्हणतोय. एक एक नमुने भरलेत,’ असे म्हणत तरुण बराच वेळ ओरडत राहिला. मात्र चालकाने बस काही थांबवली नाही. शेवटी बसस्थानक असलेल्या ठिकाणी त्याला उतरवले. दरम्यान, बसमधील दुसऱ्या प्रवाशाने याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

विविध सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

- कोरोनानंतर अनेक लोक मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत.

- चालकाने आधी दरवाजा उघडला असता, तर खूप छान झाले असते.

- आपण राजकारण्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट देतो. मग एक वेळ सामान्य माणसाला अपवाद का नाही?

- त्याच्या ऑफीस जवळ बस थांबा आहे का? आणि हा असा वेड्यासारखा का करतोय?

- त्याच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिाडिओ पोहोचल तर...?

- नशीब गडकरी साहेबांची उडणारी बस अजून सुरू झाली नाही...नाहीतर ऑफिसच्या टेरेसवरच बस थांबवा असा तो म्हणाला असता

‘नेमका प्रकार काय आहे. याची माहिती घेण्यात येत आहे. पण अशाप्रकारे वागणूक करणे अत्यंत चुकीचे आहे. दोघांची बाजू समजून घेण्यात येईल.’

- दत्तात्रेय झेंडे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhatrapati Sambhajinagar : माझ्या मुलीसारखी, पण चुकी झाली! एकटीला पाहून भररस्त्यात छेड काढली, तरुणीनं धडा शिकवताच धरले पाय

Pune Metro : 'कारशेड'साठी जागाच नाही! पुणे मेट्रोच्या चौथ्या टप्प्यात मोठा अडथळा; CWPRS ने प्रस्ताव फेटाळला

Jayant Patil vs Gopichand Padalkar : ‘...राव तेवढा ढापलेला कारखाना परत द्या’ भर चौकात लावला पोस्टर, जयंत पाटील, गोपीचंद पडळकर यांच्यातील वाद टोकाला

काठीला कापड गुंडाळल्यासारखी दिसते... बारीक असल्याने 'रात्रीस खेळ चाले' फेम अभिनेत्रीला हिणवलं; अनुभव सांगत म्हणाली-

Pune Redevelopment : लोकमान्यनगरचा पुनर्विकास राजकीय आणि 'म्हाडा'च्या हस्तक्षेपामुळे थांबला! नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT