A man in Pune pulls a new Thar SUV using donkeys while drummers play dhol, creating a viral social media moment.
esakal
Pune Man Pulls Thar SUV with Donkeys Video Goes Viral : पुणं एक असं शहर आहे, जिथं दररोज नवनवीन आणि हटके काहीना काही घडल्याचं आपल्याला दिसतं. मग ते कोणत्या विषयासाठी संबंधित असू शकतं. आताही अशीच काहीशी वेगळी परंतु सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारी अशी अन् चर्चेचा विषय ठरत असलेली घटना पुण्यात घडली आहे.
खरंतर आजकाल SUV थार या धाकड गाडीबाबत एक वेगळीच क्रेझ निर्माण झाल्याचं आपण पाहत असतो. रस्त्यावरील वाहनांमध्ये जर एखादी थार असेल तर ती अगदी उठून दिसते, शिवाय कित्येकजण अगदी वळून वळून ही गाडी पाहत असता. मात्र आता याच थारची अक्षरशा इज्जत काढणारी एक घटना पुण्यातून समोर आली आहे.
कारण, पुण्यातील एका व्यक्ती संतापाच्या भरात चक्क आपल्या लाखोंच्या थारच्या समोर गाढवं बांधून ती रस्त्याने ओढत नेली. वारंवार गाडीत तांत्रिक अडचणी उद्भवत असल्याने हा व्यक्ती प्रचंड हैराण झाला होता. अखेर त्याचा संयम संपला आणि त्याने मग या आजकाल ब्रॅण्ड ठरणाऱ्या थारच्या इज्जतीचा चक्क बँड वाजवायचं ठरवलं
संबंधित व्यक्ती डीलरच्या विरोधात आपला विरोध दर्शवण्यासाठी थारसमोर दोन गाढवं बांधली आणि मग रस्त्याने वाजवत वरातही काढली. तसंच या थारवर सह्याद्री मोटर्स गाढव आहे, त्यांच्याकडून कुठल्याही गाड्या घेऊ नका. हे लोकांची खराब गाड्या देऊन फसवणूक करत आहेत.असं लिहिलेलं बॅनरील लावलेलं होतं.