gwant mann boat video  Sakal
Trending News

Viral Video : मुख्यमंत्र्यांची बोट पुराच्या पाण्यातच डगमगली; काळजाचा ठोका चुकवणारी घटना कॅमेऱ्यात कैद

पंजाबमध्ये पुर आल्याने मुख्यमंत्र्यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली आङे.

दत्ता लवांडे

चंदीगढ : उत्तर भारतात सध्या पावासाने थैमान घातलं असून अनेक भागांत पावसामुळे पूर आला आहे. दिल्लीमध्ये यमुनेला पूर आल्यामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. तर पंजाबमध्येसुद्धा अनेक भागांमध्ये पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंग मान यांच काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ समोर आला आहे.

अधिक माहितीनुसार, पंजाबमधील काही भागांतील पुराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री गेले असता त्यांच्यासोबत एक घटना घडली आहे. त्यांची बोट पुराच्या पाण्यात डगमगली असून ही थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या बोटीमध्ये १२ ते १३ जण असल्याची माहिती समोर आली असून यामध्ये कुणालाही जखम झाली नाही. काळजाचा ठोका चुकवणारा हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

दरम्यान, मुख्यमंत्री भगवंत सिंग मान ज्या बोटीमधून पूरग्रस्त भागाची पाहणी करणार होते ती रिमोट बोट होती. मुख्यमंत्री बोटीत बसल्यानंतर २ ते ३ सेकंदातच ही घटना घडली असून ती ऑपरेट करत असताना काही तांत्रिक अडचण आली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बोट डगमगल्यानंतर दोन्ही बाजूने झुकल्याचं दिसत आहे. तर बोट झुकल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी स्वत:ला सावरल्याचं दिसत आहे. तर हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISF जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, असिस्टंट कमांडंटसह ४ जवानांचा मृत्यू

Vani News : सासरी होणाऱ्या मानहानी अन् छळाला कंटाळून तरुणाने संपविले जीवन; स्टेटसवर व्हिडिओ ठेवत उघड केला प्रकार

Japanese Encephalitis Virus: आसाममध्ये डासांमध्ये जपानी मेंदूज्वराचा जी-१ विषाणू प्रथमच आढळला; ‘एनआयव्ही’ पुण्याचे संशोधन अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

SCROLL FOR NEXT