Rabindranath Tagore Jayanti esakal
Trending News

Rabindranath Tagore Jayanti : फक्त भारतच नव्हे तर 'या' दोन देशांचं राष्ट्रगीतही टागोरांनीच लिहिलंय!

टागोरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

सकाळ डिजिटल टीम

Rabindranath Tagore Jayanti : राष्ट्रगीताचे लेखक रवींद्रनाथ टागोर आज यांची जयंती. भारतीय राष्ट्रगीत म्हणताना आणि ऐकताना सगळ्यांची छाती गर्वाने फुलून येते. देशप्रेमाचं प्रतिक असणारं आणि भारताच्या विविध प्रादेशिक भागांचा उल्लेख असणारं आपलं भारताचं राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी देशाला दिलं. नोबेल पुरस्काराने गौरवण्यात येणारे ते पहिलेच भारतीय ठरले. सगळ्यांनाच माहितीये की, टागोरांनी भारत आणि बांग्लादेशासाठी राष्ट्रगीत लिहिले.

मात्र तुम्हाला हे माहितीये काय की, आणखी एका देशाचे राष्ट्रगीत टागोरांनी लिहिलेल्या कवितेतून प्रेरणा घेत लिहीले गेले. टागोरांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

14 भावंडांचं कुटुंब अन् रवींद्रनाथ त्यात सगळ्यात लहान

रवींद्रनाथ टागोरांचा जन्म ७ मे १८६१ मध्ये जोडासांको येथील बंगाली कुटुंबात झाला. टागोरांची जयंती भारतात ७ मे तर बांग्लादेशमध्ये ९ मे ला साजरी करण्यात येते. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ टागोर आणि आईचे नाव शारदा देवी असे होते. १४ भावंडांमध्ये ते सगळ्यात लहान होते.

Rabindranath Tagore Jayanti

टागोर लॉ चे अभ्यासक होते मात्र डिग्री न घेताच विदेशातून परतले

रवींद्रनाथ टागोर लहानपणापासून अभ्यासात फार चांगले होते. त्याचं प्राथमिक शिक्षण सेंट जेवियर स्कूलमध्ये झालं. वर्ष १८७८ मध्ये इंग्लंडच्या ब्रिजस्टोन पब्लिक स्कूलमध्ये ते उच्च शिक्षण घेण्यास गेले. त्यानंतर त्यांना लंडन युनिव्हर्सिटीमधून लॉ चा अभ्यास सुरु केला. मात्र १८८० मध्ये ते डिग्री न घेताच भारतात परतले. त्यानंतर त्यांनी लिखाणाला सुरुवात केली.

श्रीलंकेच्या राष्ट्रगीतासाठी टोगारांच्या या कवितेतून प्रेरणा घेण्यात आली

रवींद्रनाथ टागोर यांनी भारतीय राष्ट्रगीत ‘जन गण मन’ तर बांग्लादेशाचे राष्ट्रगीत ‘आमार सोनार बांग्ला’ लिहिले आहे. तसेच श्रीलंकेच्या राष्ट्रगीताचा एक भाग हा टागोरांच्या कवितेतू प्रेरणा घेत लिहिला गेलाय. टागोर हे उत्तम कवि, संगीतकार, नाटककार आणि निबंधकारही होते.

८ वर्षाच्या वयात लिहिली होती पहिली कविता

टागोर लहानपणापासूनच कथा आणि कविता लिहायचे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहीली होती. १६ वर्षाच्या वयात त्यांची पहिली लघुकथा प्रकाशित झाली होती. टागोर यांनी १९०१ मध्ये पश्चिम बंगालच्या ग्रामीण भागात शांति निकेतनमध्ये शाळा उघडली. (Birth Anniversary)

१९१३ मध्ये त्यांना साहित्यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार मिळाला

टागोर हे विश्व धर्म संसदेला संबोधित करणारे दुसरे व्यक्ती ठरले. याआधी स्वामी विवेकानंद यांनी धर्म संसदेला संबोधित केलं होतं. टागोर यांनी अनेक कविता आणि पुस्तके प्रकाशित केलीत. काव्यरचना गीतांजलिसाठी रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच भारतीय ठरले. टागोरांनी हा पुरस्कार मात्र थेट स्वीकारला नव्हता तर एका ब्रिटन राजदूताने हा पुरस्कार त्यांच्याऐवजी घेतला होता.

७ ऑगस्ट १९४१ ला टागोरांचे निधन झाले

ब्रिटीश शासनाने रवींद्रनाथ टागोरांना ‘सर’अशी उपाधिही दिली होती. मात्र जालियनवाला बाग हत्यांकांडानंतर ही उपाथी टागोरांनी परत केली होती. बॅरिस्टर बनण्याचं टागोरांचं स्वप्न होतं. टागोरांना कलर ब्लाइंडनेस होता असंही त्यांच्याबाबत बोलल्या जातं. प्रोस्टेट कँसरमुळे त्यांचे ७ ऑगस्ट १९४१ मध्ये निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT